AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘चंद्रमुखी’ राज, ‘या’ नव्या स्पर्धकाची एंट्री?

आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसह स्पर्धकांना एक मोठे सरप्राईझ मिळणार आहे. लवकरच घरात ‘चंद्रमुखी चौटाला’ची एंट्री पाहायला मिळू शकते.

Bigg Boss 14 | ‘बिग बॉस 14’च्या घरात ‘चंद्रमुखी’ राज, ‘या’ नव्या स्पर्धकाची एंट्री?
| Updated on: Oct 21, 2020 | 10:56 AM
Share

मुंबई : यंदाचे ‘बिग बॉस’ पर्व प्रेक्षक आणि स्पर्धक दोघांसाठी विशेष ठरले आहे. 14 वर्षांत प्रथमच 3 माजी स्पर्धक एकाच वेळी घरात दिसले. नव्या स्पर्धकांना मार्गदर्शन करण्यासाठी ते बिग बॉसच्या घरात इतके आठवडे थांबले आहेत. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांसह स्पर्धकांना एक मोठे सरप्राईझ मिळणार आहे. लवकरच घरात ‘चंद्रमुखी चौटाला’ची एंट्री (Wild Card) पाहायला मिळू शकते. (Bigg Boss 14 Actress Kavita Kaushik will enter in house as wild card contestant)

एका टास्क दरम्यान तूफानी सिनिअर सिद्धार्थ शुक्ला आणि त्याच्या टीममधील आणखी दोन नवे स्पर्धक घराबाहेर गेल्याचे कळते आहे. लवकरच हा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हे स्पर्धक घराबाहेर पडल्यानंतर लवकरच नवे चेहरे घरात प्रवेश करणार आहेत. नैना सिंह, शार्दुल पंडित आणि प्रतिक सहजपाल यांची नावे या स्पर्धकांमध्ये घेतली जात आहेत. मात्र, यात यादीत आता आणखी एक मोठे नाव सामील झाल्याचे कळते आहे. टीव्हीची ‘चंद्रमुखी चौटाला’ अर्थात अभिनेत्री कविता कौशिक (Kavita Kaushik) बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार आहे.

या आधीही कविताच्या नावाची चर्चा सुरू होती. मात्र, तिने या गोष्टी अफवा असल्याचे म्हणत माध्यमांच्या वृत्ताला फेटाळून लावले होते. मात्र, आता तिच्या एंट्रीवर शिक्कामोर्तब झाल्याचे कळते आहे. कविता कौशिक मालिका विश्वापासून दूर गेली असली तरी ती सोशल मीडियावर सक्रिय असते. बऱ्याचदा स्पष्टवक्तेपणामुळे ती वादात सापडली होती. कविताचे हेच गुण तिला बिग बॉसची स्पर्धक बनण्यात मदत करणार आहेत. (Bigg Boss 14 Actress Kavita Kaushik will enter in house as wild card contestant)

पार पडणार सगळ्यात मोठे एलिमिनेशन

‘बिग बॉस 14’च्या घरात अचानक मोठा ट्विस्ट आला आहे. तूफानी सिनिअर आणि काही स्पर्धक या स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, एका टास्क दरम्यान, सिद्धार्थ (Sidharth Shukla) आणि त्याच्या टीममध्ये असलेले पवित्रा पुनिया (Pavitra Puniya), एजाज खान (Eijaz Khan) हरल्याने त्यांना या स्पर्धेतून बाहेर पडावे लागले आहे. त्यांच्या जागी नवे स्पर्धक या घरात एंट्री करणार आहेत. (Bigg Boss 14 Actress Kavita Kaushik will enter in house as wild card contestant)

सिद्धार्थच्या टीममध्ये निक्की तंबोलीदेखील सामील होती. मात्र, निक्कीकडे घराचे विशेषाधिकार असल्याने ती घराबाहेर जाण्यापासून बचावली आहे. ‘बिग बॉस 14’च्या घरातले हे पहिले मोठे एलिमिनेशन ठरणार आहे. पवित्रा पुनिया या पर्वाची विजेती ठरले, असा अंदाज प्रेक्षकांनी लावल्यामुळे त्यांना चांगलाच धक्का बसला आहे.

तर, पवित्रा आणि एजाजला घराबाहेर न काढता सिक्रेट रूममध्ये ठेवले जाईल, असा अंदाज प्रेक्षकांनी व्यक्त केला आहे. गेल्या पर्वातही रश्मी आणि देबोलिना यांना अशाच प्रकारे सिक्रेट रूममध्ये ठेवले होते. सध्या घरात तूफानी सिनिअर्सच्या टीम बनल्या आहेत. या टीमला एकत्रितपणे नवे टास्क पार पडायचे आहेत.

(Bigg Boss 14 Actress Kavita Kaushik will enter in house as wild card contestant)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.