Bigg Boss | ‘विकेंड का वार’ रद्द, रुबिना दिलाक पर्वाची विजेती ठरेल, ‘या’ तूफानी सिनिअरचा दावा!

दर, शनिवार आणि रविवारी सलमान खान ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांची शाळा घेतो. मात्र, या शनिवारी ‘विकेंड का वार’ झाला नाही.

Bigg Boss | ‘विकेंड का वार’ रद्द, रुबिना दिलाक पर्वाची विजेती ठरेल, ‘या’ तूफानी सिनिअरचा दावा!
Follow us
| Updated on: Oct 18, 2020 | 10:57 AM

मुंबई :बिग बॉस’च्या (Bigg Boss) घरात शनिवारी ‘विकेंड का वार’ दिसला नाही. दर, शनिवार आणि रविवारी सलमान खान ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांची शाळा घेतो. मात्र, या शनिवारी ‘विकेंड का वार’ प्रेक्षकांना पाहायला मिळाला नाही. वास्तविक, शुक्रवारच्या दिवशीच या दोन्ही भागाचे चित्रीकरण पूर्ण झालेले असते, मात्र, यावेळी हे चित्रीकरण शनिवारी पार पडल्याने पुढच्या दोन भागांत सलमानचा ‘विकेंड वार’ बघायला मिळणार आहे. ‘विकेंड का वार’ नसला तरी, स्पर्धकांची तारांबळ उडालेली पाहायला मिळाली. यातच तूफानी सिनिअर हीना खानने रुबिना (Rubina Dilaik) विजेती ठरेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. (Bigg Boss 14 Latest update rubina Dilaik will win this game says Heena Khan)

निक्की तंबोलीमुळे स्पर्धक हैराण

निक्की तंबोलीमुळे घरातील इतर स्पर्धक चांगलेच हैराण झाले आहेत. निक्कीच्या शिव्या देण्याच्या सवयीपासून ते घरात काम न करण्याच्या नाटकांमुळे घरतील बाकीच्या स्पर्धकांनमध्ये वाद पाहायला मिळाले. यासगळ्यामुळे निक्कीला पुन्हा एकदा ‘फ्रेशर’ बनवण्याची संधी ‘बिग बॉस’ने (Bigg Boss) घरातल्यांना दिली होती. या टास्कनुसार घरातल्या इतर स्पर्धकांना तिचे ‘स्थायी सदस्य’पद काढून घायायचे होते. मात्र, यातही बहुमत सिद्ध न करता आल्याने निक्की विजयी ठरली. यात जान कुमार सानू, निशांत मलकानी, राहुल वैद्य, पवित्रा, एजाज यांनी निक्कीची बाजू घेतली, तर रुबिना, अभिनव, शहजाद, आणि जास्मीन भसीन हे स्पर्धक निक्कीच्या विरोधात उभे ठाकले होते.

रुबिना ‘बिग बॉस’ची विजेती ठरेल

‘बिग बॉस’चे ‘तूफानी सिनिअर्स’ हीना खान आणि गौहर खान रुबिनाच्या खेळणे प्रभावित झाल्या आहेत. मागील काही भागांपासून त्या दोघीही रुबिनाची बाजू घेताना दिसत आहेत. तर, हीना खानने थेट रुबिनाच (Rubina Dilaik) या पर्वाची विजेती ठरेल, असा दावा केला आहे. मात्र, सिद्धार्थ शुक्ला या निर्णयाच्या विरोधात दिसला. (Bigg Boss 14 Latest update rubina Dilaik will win this game says Heena Khan)

जेवणावरून पुन्हा गोंधळ

अभिनव आणि रुबिनावर (Rubina Dilaik) घरातील स्वयंपाक घराची जबाबदारी सोपवण्यात आली होती. मात्र, या टास्कमध्ये त्यांनी कामचोरी केल्याने, घरातल्यांनी त्यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली. अखेर या नवरा-बायकोंना नमते घेत घरातल्यांचे म्हणणे काबुल करावे लागले.

पवित्रा आणि राहुलमध्ये वाद

पुन्हा एकदा राहुल आणि पवित्रा यांच्यात भांडण झाले आहे. वास्तविक, पवित्रा निशांत आणि जान यांच्याशी राहुलसंदर्भात बोलत होती. ज्यामुळे चिडलेल्या राहुलने पवित्राशी वाद घालायला सुरुवात केली. दोघांचे भांडण इतके वाढले की त्यांनी थेट एकमेकांच्या ‘वडिलां’चा उद्धार करायला सुरुवात केली.

(Bigg Boss 14 Latest update rubina Dilaik will win this game says Heena Khan)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.