Bigg Boss 14 | कविता कौशिक-अली गोनी दरम्यान खडाजंगी, दिवाळीच्या दिवसांत घरात मोठा धमाका!

कव्वाली’च्या मूडमध्ये दोन्ही टीमच्या स्पर्धकांनी एकमेकांविरोधात बरीच टीका केली.

Bigg Boss 14 | कविता कौशिक-अली गोनी दरम्यान खडाजंगी, दिवाळीच्या दिवसांत घरात मोठा धमाका!
Follow us
| Updated on: Nov 16, 2020 | 6:29 PM

मुंबई : दिवाळीनिमित्त ‘बिग बॉस 14’च्या (Bigg Boss 14) घरात बरेच बॉम्ब फुटताना दिसले. सणाच्या निमित्ताने घरात बरीच धमाल मस्ती पाहायला मिळाली. ‘बिग बॉस 14’च्या ‘वीकेंड का वार’च्या सुरूवातीला घरातील लोक दिवाळी सेलिब्रेशनच्या (Diwali Celebration) मूडमध्ये दिसले. पारंपरिक भारतीय लूक तसेच डोक्यावर कव्वाली टोपी परिधान करुन स्पर्धकांनी सलमान खानचे स्वागत केले. तर, दिवाळी निमित्ताने घरात कव्वालीची मैफिल रंगली होती. राहुल वैद्य आणि जान कुमार सानू या दोघांनीही ‘कव्वाली’  सादर करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र, कव्वालीच्या या कार्यक्रमानंतर आता कविता कौशिक (Kavita Kaushik) आणि ‘कर्णधार’ अली गोनी (Aly Goni) यांच्या दरम्यान जोरदार भांडण होणार आहे (Bigg Boss 14 Kavita Kaushik and aly goni fight).

‘कव्वाली’च्या निमित्त साधत घरातील स्पर्धकांनी एकमेकांवर तूफान शेरेबाजी केली. ‘कव्वाली’च्या मूडमध्ये दोन्ही टीमच्या स्पर्धकांनी एकमेकांविरोधात बरीच टीका केली. यातूनच कविता आणि एजाज यांनी एकमेकांबद्दलचा राग देखील व्यक्त केला. या कव्वालीदरम्यान राहुल आणि जान यांच्यात कमालीची जुगलबंदी दिसली. होस्ट सलमान खाननेही या मजेदार कव्वालीचा आनंद लुटला.

अली गोनी-कविता कौशिक यांच्या वादाचा धमाका

येत्या एपिसोडमध्ये सगळ्यांना कविता कौशिकचे एक वेगळे रूप पाहायला मिळणार आहे. नॉमिनेशन टास्कमध्ये बिग बॉसने अलीला घरातील कोणत्याही 6 स्पर्धकांना निवडण्याचा अधिकार दिला. ‘बिग बॉस’च्या या आदेशानंतर अलीने रुबीना दिलैक, निक्की आणि कविता कौशिक यांची नावे नॉमिनेट केली. याच कारणावरून अली गोनी आणि कविता यांच्यात मोठी वादा-वादी रंगली. कविता कौशिकने अलीवर ‘ग्रुपमध्ये’ खेळत असल्याचा आरोप केला. तर, आपण हा खेळ वैयक्तिकरित्या खेळत असून, उत्तम पद्धतीने खेळत आहोत, असे कविता म्हणाली. तर, या वादादरम्यान अलीने कविताला ‘पागल औरत’ म्हटले. प्रत्युत्तर देताना कविताने त्याला ‘बदतमीज गुंडा’ म्हटले. यावरून आता दोघांमध्ये चांगलीच जुंपणार आहे (Bigg Boss 14 Kavita Kaushik and aly goni fight).

(Bigg Boss 14 Kavita Kaushik and aly goni fight)

गुलाब जामुन टास्क

‘कव्वाली’ मैफिलीनंतर सलमान खानने घरातील सदस्यांना एक नवीन टास्क दिला. या टास्कचे नाव ठेवण्यात आले होते ‘गलतफहमी के गुलाबजामुन’. या टास्कमध्ये घरातील सर्व स्पर्धकांना एकमेकांचे गैरसमजूती सांगून गुलाबजामुन खायला देतात. या टास्कमध्ये अली गोनीने जास्मीन भसीनला, एजाज खानने निक्की तंबोलीला, जास्मीन भसीनने रुबीना दिलैक, राहुल वैद्यने एजाज खानला, एजाज खानने पवित्र पुनिया, जान कुमार सानूने निक्की तंबोलीला, पवित्रा पुनियाने निक्की तंबोलीला, रुबीना दिलैकने निक्की तंबोलीला तर, कविता कौशिकने पवित्रा पुनियाला हे गुलाब जामुन खाऊ घातले (Bigg Boss 14 Kavita Kaushik and aly goni fight).

शार्दुल पंडित ‘बेघर’

या आठवड्यात शार्दुल पंडित घरातून ‘बेघर’ झाला आहे. यावेळी सलमान खानने मतमोजणी सांगितली. सलमान खान म्हणाला की, रुबीनापेक्षा शार्दुलला कमी मते मिळाली. परंतु, या दोघांच्या मतात फार कमी अंतर होते. यावेळी सलमान खान म्हणाला की, शार्दुलची आई आजारी आहे. यामुळे शार्दूल जेव्हा घरातून बाहेर जाईल, तेव्हाच त्याच्या आईबरोबर वेळ घालवू शकेल. यावेळी शार्दुलच्या आईसाठी प्रार्थना करण्याची विनंतीही सलमानने प्रेक्षकांना आणि स्पर्धकांना केली.

(Bigg Boss 14 Kavita Kaushik and aly goni fight)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.