AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस’चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार! पाहा कोण असणार नवे स्पर्धक

छोट्या पडद्यावरचा शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा 14वा सीझन संपला, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या 15व्या (Bigg Boss 15) सीझनची प्रतीक्षा आहे आणि त्यादरम्यान, आगामी सीझनबद्दल काही अपडेट देखील समोर आल्या आहेत.

Bigg Boss 15 | ‘बिग बॉस’चा नवा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार! पाहा कोण असणार नवे स्पर्धक
सलमान खान
| Updated on: May 29, 2021 | 10:32 AM
Share

मुंबई : छोट्या पडद्यावरचा शो ‘बिग बॉस’ प्रेक्षकांना खूप आवडतो. या वर्षाच्या फेब्रुवारीमध्ये बिग बॉसचा 14वा सीझन संपला, ज्याची विजेती रुबीना दिलैक ठरली. आता चाहत्यांना या शोच्या 15व्या (Bigg Boss 15) सीझनची प्रतीक्षा आहे आणि त्यादरम्यान, आगामी सीझनबद्दल काही अपडेट देखील समोर आल्या आहेत. बिग बॉस 14च्या अंतिम सोहळ्यामध्ये सलमान खानने जाहीर केले होते की, 15 व्या हंगामात सामान्य लोकदेखील या कार्यक्रमाचा एक भाग होऊ शकणार आहेत. म्हणजेच या पर्वात सेलिब्रेटींसह सामान्य लोक देखील बिग बॉसच्या घरात दिसणार आहेत (Bigg Boss 15 new season coming soon know about contestant).

या शोची ऑडिशन प्रक्रिया फेब्रुवारीमध्येच सुरू झाली होती. बिग बॉस 15साठी ऑडिशनची प्रक्रिया 22 फेब्रुवारीपासून सुरू झाली आणि 31 मे 2021 पर्यंत चालणार आहे. शोमध्ये मेकर्सना धडाकेबाज स्पर्धक हवे आहेत, म्हणून ज्याला असे वाटते की आपण या शोसाठी परिपूर्ण आहोत, त्यांनी आपला व्हिडीओ शूट करुन तो ऑडिशनसाठी पाठवावा.

कशी कराल नोंदणी?

नोंदणी करण्यासाठी तुम्हाला व्हूट अ‍ॅप डाऊनलोड करावे लागेल किंवा तुम्ही www.voot.com वर जाऊनही नोंदणी करू शकता. नोंदणी फॉर्ममध्ये आपल्याला नाव, मोबाईल नंबर, ईमेल पत्ता आणि ऑडिशन व्हिडीओ यासारखे काही तपशील विचारले जातील. या ऑडिशनसाठी आपण 18 वर्षाच्या वरीलचे असणे आवश्यक आहे. तसेच, व्हिडीओ 5 मिनिटांपेक्षा मोठा नसावा आणि 50 एमबीपेक्षा जास्त नसावा.

‘शो’ची प्रीमियर डेट

सध्या ‘बिग बॉस 15’च्या प्रीमियरची तारीख ऑक्टोबर 2021 असल्याचे सांगण्यात येत आहे. तथापि, अद्याप तारीख निश्चित झालेली नाही (Bigg Boss 15 new season coming soon know about contestant).

कोण असणार स्पर्धक?

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, या वेळी निर्मात्यांना काही एक्स जोड्यांसह, सामान्य लोकांना देखील शोमध्ये आणायचे आहे. याशिवाय काही स्पर्धकांची नावे देखील पुढे आली आहेत.

दिव्यंका त्रिपाठी-विवेक दहिया

दिव्यांका सध्या खतरों के खिलाडी 11मध्ये भाग घेण्यासाठी केपटाऊनमध्ये पोहोचली आहे. ‘बिग बॉस’च्या निर्मात्यांनी या दोघांकडे संपर्क साधला. मात्र, या जोडीने शोला होकार दिला आहे की, नाही याची अद्याप खात्री नाही.

नेहा मर्दा

‘बालिका वधू’मध्ये काम करणार्‍या नेहा मर्दाने नुकतीच पुष्टी केली की, बिग बॉस 15साठी तिच्याशी संपर्क झाला होता. नेहा म्हणते की, बायो बबलमध्ये शूटिंग केल्यामुळे तिला वाटते की, ती बिग बॉसच्या घरात मिनी ट्रायल देत आहे. ती म्हणाली, या अनुभवानंतर मी बिग बॉसमध्ये गेले तर मी एक प्रबळ दावेदार होईन आणि मी हा कार्यक्रम जिंकू शकेन.

या शिवाय या शोमध्ये अभिनेत्री सान्या इराणी देखील दिसू शकते. या शोसाठी अभिनेत्रीला देखील ऑफर देण्यात आली आहे.

(Bigg Boss 15 new season coming soon know about contestant)

हेही वाचा :

Best Feature Films : शॉर्टफिल्म पाहून बनवले गेले ‘हे’ जबरदस्त चित्रपट, पाहून आजही प्रेक्षक म्हणतात व्वा!

Big Investment | अमिताभ बच्चन बनणार सनी लिओनीचे शेजारी, मुंबईत खरेदी केले 31 कोटींचे घर!

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.