Naagin: एकता कपूरला भेटली नवी ‘नागिन’? ‘बिग बॉस 16’मधील ही अभिनेत्री घेणार तेजस्वी प्रकाशची जागा

Bigg Boss 16 मधील अभिनेत्रीला एकता कपूरची ऑफर? 'नागिन 7'मध्ये साकारणार मुख्य भूमिका

Naagin: एकता कपूरला भेटली नवी नागिन? बिग बॉस 16मधील ही अभिनेत्री घेणार तेजस्वी प्रकाशची जागा
Naagin 6
Image Credit source: Instagram
| Updated on: Jan 15, 2023 | 9:02 AM

मुंबई: टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका ‘नागिन 6’ लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची घोषणा निर्माती एकता कपूरने काही दिवसांपूर्वी केली. अभिनेत्री तेजस्वी प्रकाश या सहाव्या सिझनमध्ये मुख्य भूमिका साकारतेय. एकताने तेजस्वीला जेव्हा बिग बॉसच्या घरात पाहिलं, तेव्हा तिने नागिन या मालिकेची ऑफर तिला दिली. आता एकता कपूर पुन्हा एकदा बिग बॉस 16 मधील एका स्पर्धकाला ‘नागिन’ या मालिकेच्या नव्या सिझनची ऑफर देणार आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच ती यावर्षीही बिग बॉसच्या स्पर्धकाला तिच्या दोन प्रोजेक्ट्ससाठी साइन करणार आहे.

एकताने तेजस्वी प्रकाशची जागा घेणाऱ्या नव्या अभिनेत्रीवर शिक्कामोर्तब केल्याचं कळतंय. ही अभिनेत्री प्रियांका चहर चौधरी आहे. इतकंच नव्हे तर एकता ही प्रियांका चौधरीला चित्रपटासाठी आणि सुंबुल तौकीर खानला मालिकेसाठी निवड करू शकते, असंही म्हटलं जात आहे.

बिग बॉस 16 चा सूत्रसंचालक सलमान खाननेही प्रियांका चौधरीसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. भविष्यात मला साजिद खान आणि प्रियांका चौधरी यांच्यासोबत काम करायला आवडेल, असं सलमानने म्हटलंय. याआधी सलमानने प्रियांकाला ‘हिरोइन मटेरियल’ असंही म्हटलं होतं.

‘बिग बॉस 15 च्या घरात मला माझी नागिन सापडली. कोरोना काळात ताप आणि खोकला असताना मी कलर्स आणि मनीषाला सांगितलं की मला तिला कास्ट करायचं आहे. पण आता एका चित्रपटाच्या घोषणेसाठी मी पुन्हा बिग बॉस 16 च्या घरात जात आहे. आता यावेळी तिथे मला कोण सापडतंय, ते पाहुयात. बाय बाय नागिन’, अशी पोस्ट एकता कपूरने लिहिली  होती.

‘नागिन’ या मालिकेचा मोठा चाहतावर्ग आहे. आतापर्यंत या मालिकेचे सहा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आले. सहाव्या सिझनमध्ये बिग बॉस फेम तेजस्वी प्रकाशने मुख्य भूमिका साकारली आहे.