Big Boss-16 बिग बॉस-16 सिझनमध्ये सहभागी होणार हा ‘रॅपर’

बिग बॉसच्या प्रोमोना चाहत्यांकडूनही चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावरही याचे प्रोमो चांगलेच व्हायरल झाले आहेत. रॅपर मैक स्टेन सोबतच सलमान खानचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Big Boss-16 बिग बॉस-16 सिझनमध्ये सहभागी होणार हा 'रॅपर'
Big Boss -16
Image Credit source: Instagram
प्राजक्ता ढेकळे

|

Oct 01, 2022 | 3:50 PM

बिग-बॉस-16 सिझनचा (Big Boss)प्रोमो सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. याचे प्रोमोही रिलीज होण्यास सुरवात झाली आहे. आता या स्पर्धेतील स्पर्धकांची नावेही जाहीर होण्यास सुरुवात आहे. या शो च्या एका प्रोमोमध्ये सूत्रसंचालक सलमान खान (Salman Khan )एका स्पर्धकाशी बोलत आहे. त्याशी बोलल्यानंतर सलमान खान ’12  साल मे ऐसा आयटम पहिली बार आया है’ असे म्हणताना दिसून आला आहे. रॅपर मैक स्टेन(rapper mc stan )यात स्पर्धेकी म्हणून सहभागी होणार आहे.

सिझन 16  सुरु होण्याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. बिग बॉसच्या प्रोमोना चाहत्यांकडूनही चांगलीच पसंती मिळत आहे. सोशल मीडियावरही याचे प्रोमो चांगलेच व्हायरल झाले आहेत. रॅपर मैक स्टेन सोबतच सलमान खानचा व्हिडीओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

रॅपर मैक च्या बोलण्याचा सलमान खानही आनंद घेताना दिसत आहे. कलर्स वाहिनीने त्यांच्या इंस्टाग्रामवर चार तासांच्या पूर्वी पोस्ट केलेल्या या व्हिडीओला जवळ सात लाखाहून अधिक व्हूज मिळाले आहेत. अनेकांनी कमेंट करत त्याचे कौतुक केलं आहे. तर अनेकांनी फायरच्या इमोजीही पोस्ट केल्या आहेत.

बिग बॉस 16 मध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांच्यामध्ये अब्दू रोजिक,निमृत कौर अहलुवालिया, गोरी नागोरी, प्रियांका चहर चौधरी आणि अंकित गुप्ता यांची नाव समोर आली आहेत.सिझन 16  नेमका कसा राहणार , कोण गाजवणार याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे. येत्या 16 ऑक्टोबरला कलर्स वाहिनीवर हा शो प्रसारित होणार आहे.या शोमधील अधिकृत नावांची यादी आद्यपही प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें