AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 Grand Finale : मुनव्वर, मन्नारा नाही तर, ‘या’ दोन स्पर्धकांमध्ये असणार ‘कांटे की टक्कर’

Bigg Boss 17 Grand Finale : सर्वांना वाटतं मुनव्वर फारुकी होणार 'बिग बॉस 17' चा विजेता, पण असं काहीही नाही... 'या' दोन स्पर्धकांमध्ये असणार 'कांटे की टक्कर' असण्याची शक्यता... सर्वत्र फक्त आणि फक्त 'बिग बॉस 17' ची चर्चा...

Bigg Boss 17 Grand Finale : मुनव्वर, मन्नारा नाही तर, 'या' दोन स्पर्धकांमध्ये असणार 'कांटे की टक्कर'
| Updated on: Jan 28, 2024 | 5:15 PM
Share

Bigg Boss 17 Grand Finale : ‘बिग बॉस 17’ शोचा विजेता घोषित होण्यासाठी काही तास फक्त शिल्लक आहेत. वेळ जशी जवळ येत आहे, तशी चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे. शोच्या विजेत्याचं नशीब जनता ठरवणार आहे. तर अभिनेता आणि ‘बिग बॉस 17’ शोचा होस्ट सलमान खान विजेत्याच्या नावाची घोषणा करणार आहे. अंकिता लोखंडे, मुनव्वर फारुकी, मन्नारा चोप्रा, अरुण माशेट्टी आणि अभिषेक कुमार ‘बिग बॉस 17’ चे टॉप 5 स्पर्धक आहेत. पण सर्वत्र फक्त आणि फक्त मुनव्वर आणि मन्नारा यांच्या नावाची घोषणा होत आहे. तर मुनव्वर ‘बिग बॉस 17’ ची ट्रॉफी घरी घेऊन जाईल अशी देखील चर्चा रंगत आहे.

सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त जर-तरचा खेळ सुरु आहे. पण आता जी यादी समोर येत आहे, त्यामध्ये मुनव्वर अव्वल स्थानी नसल्याचं दिसत आहे. सध्या सर्व स्पर्धकांमध्ये कांटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पण आता 5 स्पर्धांमध्ये 2 स्पर्धकांची नावे टॉपला आहेत. सध्या त्या दोन स्पर्धकांच्या नावाची तुफान चर्चा रंगली आहे.

शनिवारी आलेल्या माहितीनुसार, मुनव्वर पहिल्या, अभिषेक दुसऱ्या, अंकिता तिसऱ्या, मनारा चौथ्या आणि अरुण पाचव्या क्रमांकावर होते. पण आता ‘बिग बॉस तक’ पेजने शेअर केलेल्या माहितीनुसार मुनव्वरचे नाव टॉप 2 मध्ये देखील नाही. ‘बिग बॉस तक’नुसार ‘बिग बॉस 17’ शोसाठी अभिषेक कुमार (Abhishek Kumar) आणि अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) यांच्यामध्ये कांटे की टक्कर असल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मुनव्वर याचे चाहते निराश झाले आहेत.

मुनव्वर याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील मुनव्वर याचे व्हिडीओ तुफान व्हायरल होत असतात. ‘बिग बॉस 17’ च्या घरात असताना मुनव्वर याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दल अनेक चर्चा रंगल्या… आता चाहते फक्त ‘बिग बॉस 17’ शोच्या विजेत्याच्या प्रतीक्षेत आहेत.

कधी आहे ‘बिग बॉस 17’ ग्रॅन्ड फिनाले?

‘बिग बॉस 17’ ग्रॅन्ड फिनाले रविवारी संध्याकाळी 6 वाजता सुरु होणार आहे. रात्री 12 वाजे पर्यंत कार्यक्रम रंगणार आहे. रात्री 12 नंतर सलमान खान ‘बिग बॉस 17’ विजेत्याची घोषणा करणार आहे. बिग बॉस 17 चा ग्रँड फिनाले चाहते आज संध्याकाळी सहापासून कलर्स टीव्हीवर पाहू शकता. याशिवाय जिओ सिनेमा या ॲपवरही तुम्हाला पाहता येणार आहे. जिओ सिनेमावर तुम्हाला ग्रँड फिनाले मोफत पाहाता येणार आहे.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा