
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि ऐश्वर्या शर्मा यांच्यामध्ये मोठा वाद झाला. बिग बॉस 17 ला सुरूवातीच्या आठवड्यांमध्ये फार काही धमाका करण्यात यश मिळाले नाही. मात्र, आता कुठेतरी बिग बॉस 17 रेसमध्ये आल्याचे बघायला मिळतंय. बिग बॉस 17 चा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला. या व्हिडीओमध्ये चक्क बॅगमधून दूध काढताना अंकिता लोखंडे ही दिसलीये. अंकिता लोखंडे हिने चोरून आपल्या बॅगमध्ये दूध ठेवल्याचे बघायला मिळाले.
इतकेच नाही तर नेहमीच्या सीजनप्रमाणेच यंदा देखील बिग बॉस 17 मध्ये काॅफीवरून मोठा वाद होताना दिसतंय. बिग बॉस 17 च्या निर्मात्यांनी मोठा निर्णय घेत. घरातील सदस्यांना अगोदरचे राशन जमा करण्यास सांगितले यावेळी चक्क दूध आणि काॅफी बॅगमधून काढण्यात आली. याचेच व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत.
बिग बॉस 17 च्या घरात सध्या 17 सदस्य आहेत. इतकेच नाही तर यावेळी तब्बल नऊ सदस्य हे नाॅमिनेशनमध्ये आहेत. घरातील नेमके कोण बाहेर जाणार यावर चर्चा रंगली आहे. अशी एक चर्चा आहे की, ईशा हिचा बाॅयफ्रेंड समर्थ या आठवड्यामध्ये बिग बॉस 17 च्या घराबाहेर पडणार असल्याची जोरदार चर्चा ही रंगताना दिसत आहे. यावेळी दोन सदस्य घरातून बाहेर पडणार असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
इतके नाही तर धक्कादायक बाब म्हणजे नील भट्ट हा देखील या आठवड्यामध्ये बिग बॉस 17 मधून बाहेर पडू शकतो. जर खरोखरच नील भट्ट हा बिग बॉस 17 मधून बाहेर पडला तर हा सर्वांसाठी मोठा धक्का असणार आहे. बिग बॉस 17 च्या घरात नील भट्ट याचा काही खास गेम हा बघायला मिळत नाहीये. तो फक्त पत्नी ऐश्वर्या शर्मा हिला समजवताना दिसतोय.
बिग बॉस 17 मधील मोठे वाद होताना दिसले आहेत. बिग बॉस 17 टीआरपीमध्ये मोठा हंगामा करणार असल्याची देखील एक चर्चा तूफान रंगताना दिसत आहे. बिग बॉस 17 मध्ये अंकिता लोखंडे आणि मनारा चोप्रा यांच्यामध्ये वाद हा बघायला मिळतोय. मनारा चोप्रा ही देखील या आठवड्यामध्ये नाॅमिनेट आहे, परंतू मनारा चोप्रा हिचा गेम चाहत्यांना जबरदस्त आवडताना दिसत आहे.