AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंकिता लोखंडे हिला मोठा धक्का, थेट ‘बिग बाॅस 17’च्या रेसमधून बाहेर? हैराण करणारा ट्विस्ट

बिग बाॅस 17 चा फिनाले जवळ आलाय. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे. फिनाले जवळ आल्यापासून घरात मोठे हंगामे हे होताना दिसत आहेत. बिग बाॅसचा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ आहे. आता लवकरच बिग बाॅस 17 च्या विजेत्याची घोषणा केली जाईल.

अंकिता लोखंडे हिला मोठा धक्का, थेट 'बिग बाॅस 17'च्या रेसमधून बाहेर? हैराण करणारा ट्विस्ट
| Updated on: Jan 22, 2024 | 3:20 PM
Share

मुंबई : बिग बाॅस 17 मध्ये धमाका होताना दिसतोय. बिग बाॅस 17 ची चाहत्यांमध्ये एक क्रेझ नक्कीच आहे. आता बिग बाॅस 17 चा फिनाले वीक सुरू आहे. बिग बाॅस 17 चा विजेता कोण होणार याबद्दल चाहत्यांमध्ये मोठे क्रेझ नक्कीच आहे. फिनाले वीक जवळ आल्यापासून घरात मोठे धमाके होताना दिसत आहेत. बिग बाॅस 17 च्या घरातून ईशा ही बाहेर पडलीये. तिला बिग बाॅस 17 च्या विजेते पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. आयशा आणि ईशा दोघीही बेघर झाल्या आहेत. आता विजेता कोण होणार याबद्दल चर्चा होताना दिसतंय.

सध्या कलर्स टीव्हीकडून सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करण्यात आलीये. मात्र, या पोस्टमुळे मोठा गोंधळ झाल्याचे बघायला मिळतंय. कलर्सकडून करण्यात आलेल्या या पोस्टमध्ये सांगण्यात आलंय की, यामधून जनतेने बिग बाॅस 17 चा विजेता निवडावा. मात्र, या पोस्टमध्ये एक अत्यंत हैराण करणारे आहे, ज्यामुळे विविध चर्चा या रंगल्या आहेत.

कलर्स टीव्हीकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये अंकिता लोखंडे हिचे नावच नाहीये. या पोस्टमध्ये अंकिता लोखंडे हिचे नाव नसल्याने लोक हे चांगलेच हैराण होताना दिसत आहेत. कलर्सकडून शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार यांचेच नाव आहेत.

या पोस्टमध्ये अंकिता लोखंडे हिचे नाव नसल्याने चाहते हे हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. हेच नाही तर अंकिता लोखंडे हिचा पत्ताकट झाल्याची देखील जोरदार चर्चा आहे. हेच नाही तर टाॅप 3 मध्ये अंकिता लोखंडे नसल्याचे सांगितले जात आहे. टाॅप 3 मध्ये मुनव्वर फारूकी, मनारा चोप्रा आणि अभिषेक कुमार हेच पोहचले असल्याचा अंदाजा हा लावला जातोय.

खरोखरच ही पोस्ट अंकिता लोखंडे हिच्या चाहत्यांसाठी धक्कादायक आणि हैराण करणारी आहे. अंकिता लोखंडे ही बिग बाॅस 17 च्या घरात सर्वाधिक चर्चेत असणारी स्पर्धेक ठरली. हेच नाही तर बिग बाॅस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना देखील दिसली. अनेक गंभीर आरोप हे अंकिता लोखंडे हिच्यावर करण्यात आले.

Follow Us