AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 17 : बिग बॉस जिंकताच मुनव्वर मालामाल… ट्रॉफी, कार आणि मिळाली एवढी रक्कम

बिग बॉस सीझन 17 च्या विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. नेहमीप्रमाणे यावेळीही सलमान खानने विजेत्याच्या नावाची घोषणा केली. मुनव्वर फारुकी याच्या नावाची घोषणा होताच त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. पण त्याचेळी अभिषेक कुमारचेही हृदय तुटले. या वेळी बिग बॉसचा सीझन अनेक कारणांमुळे चर्चेत राहिला आहे. विजेत्याला फक्त बिग बॉसची ट्रॉफीच नव्हे तर आणखीही बरंच काही मिळालं.

Bigg Boss 17 : बिग बॉस जिंकताच मुनव्वर मालामाल... ट्रॉफी, कार आणि मिळाली एवढी रक्कम
| Updated on: Jan 29, 2024 | 7:35 AM
Share

Bigg Boss 17 : बिग बॉस 17 बहुचर्चित सीझन काल रात्री संपला. या शोचा भव्य ग्रँड फिनाले पार पडला, ज्यामध्ये होस्ट सलमान खानने नेहमीच्या अंदाजात विजेत्याचे नाव जाहीर केले. डोंगरीचा स्टार मुनव्वर फारूखी हा सलमान खानच्या या रिॲलिटी शोचा विजेता होण्यास यशस्वी ठरला आहे. संपूर्ण सीझनभर मुनव्वर फारूकी हा चर्चेत होता. कधी स्पर्धकांसोबतच्या मैत्रीमुळे तर कधी झालेल्या मोठ्या भांडणांमुळे, त्याची नेहमीच चर्चा झाली. एवढंच नव्हे तर त्याच्या पर्सनल लाईफमुळेही तो बिग बॉसच्या संपू्र्ण सीझनमध्ये चर्चेत होताच.

मुनव्वर हा विजयाचा मोठा दावेदार असेल असे वर्णन सोशल मीडियावर केले जात होते. मात्र टीव्ही स्टार, अंकिता लोखंडे आणि मन्नारा चोप्रा यांच्याशी त्याला कडवी टक्कर द्यावी लागेल, अशा अटकळी बांधल्या जात होत्या. मात्र, अंकिता असो किंवा मन्नारा चोप्रा या दोघींनाही टॉप 2 मध्ये पोहोचता आले नाही. सर्वांना आश्चर्यचकित करत, अभिनेता अभिषेक कुमारने टॉप 2 मध्ये स्थान मिळवले. मात्र त्याला विजय मिळवत ट्रॉफीवर नाव काही कोरता आले नाही.

बिग बॉसच्या विजेत्याला काय-काय मिळालं?

नेहमीप्रमाणे बिग बॉस विजेता ठरलेल्या स्पर्धकाला, अर्थात यावेळी मुनव्वर फारुकी याला बिग बॉसची ट्रॉफी या सीझनमध्ये मिळाली आहे. मात्र, यावेळी बिग बॉसच्या विजेत्याची ट्रॉफी थोडी वेगळी आहे. याशिवाय त्याला ह्युंदाईची चमकणारी क्रेटा कारही मिळाली आहे. एवढंच नव्हे तर या वर्षी विजेता ठरलेल्या स्पर्धकाला, अर्थात मुनव्वर 50 लाख रुपयांचे बक्षीसही मिळाले. 15 आठवडे चाललेल्या या शोमध्ये 21 स्पर्धक होते, परंतु मुनव्वर फारुकीने सर्वांना मागे टाकले आणि ही सर्व बक्षिसे जिंकली.

15 ऑक्टोबरला सुरू झाला शो

बिग बॉसचा हा सीझन गेल्या वर्षी 15 ऑक्टोबरपासून सुरू झाला होता. हा शो 107 दिवस चालला. या शोमध्ये बरीच मारामारी पाहायला मिळाली. अनेक स्पर्धकांचे वैयक्तिक आयुष्य लोकांसमोर आले.अनेक स्पर्धकांचे मन दु:खी झाले तर काहींची घरे उद्ध्वस्त झाली. अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यातही बरेच वाद झाले, ते सतत चर्चेत होते. यावेळी 21 स्पर्धकांनी बिग बॉसमध्ये भाग घेतला होता. 15 आठवडे चाललेल्या या ट्रॉफीच्या लढाईत स्पर्धक एक एक करत बाहेर पडत राहिले. पाच स्पर्धक अंतिम फेरीत पोहोचले. शेवटी ट्रॉफी मुनव्वर फारुकी याने विजय मिळवत ट्रॉफीवर नाव कोरले.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा