AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 18 House: गार्डन एरिया, बेडरूम, जेल आणि बरंच काही…, कसं आहे ‘बिग बॉस’चं नवं घर? व्हिडीओ समोर

Bigg Boss 18 House: हटके आणि खास असणार आहे 18 व्या पर्वातील बिग बॉसचं घर, सलमान खानच्या 'बिग बॉस'च्या घरातील पहिली झलक समोर, गार्डन एरिया, बेडरूम, जेल आणि बरंच काही..., पाहा व्हिडीओ, सध्या सर्वत्र व्हिडीओची चर्चा...

Bigg Boss 18 House: गार्डन एरिया, बेडरूम, जेल आणि बरंच काही..., कसं आहे 'बिग बॉस'चं नवं घर? व्हिडीओ समोर
| Updated on: Oct 05, 2024 | 10:37 AM
Share

‘बिग बॉस 18’ शोचा सेट तयार आहे. ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वातील घरात काही खास गोष्ट होती. यंदाच्या वर्षी देखील घरातील अनेक हटके बाजू प्रेक्षकांना दिसणार आहेत. गार्डन एरिया पासून ते जेल पर्यंत सर्वकाही विशेष थिम लक्षात घेऊन तयार करण्यात आलं आहे. सांगायचं झालं तर, रिऍलिटी शोचे सेट तयार करणारे डिझायनर ओमंग कुमार यांनी ‘बिग बॉस’च्या घराबद्दल अनेक नव्या गोष्टी सांगितल्या आहेत.

ओमंग कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘पूर्वी प्रमाणे यंदाच्या वर्षी घर वेगवेगळ्या रंगांनी संजलेलं नाही. ”टाइम का तांडव’ या थीमच्या आधारावर सेट तयार करण्यात आलं आहे. आम्ही असा सेट तयार केला आहे, ज्यामुळे जुन्या काळातील आठवणी ताज्या होतील… शिवाय स्पर्धकांमध्ये गोंधळ देखील निर्माण होईल. घरात काय आणि कसं होईल याबद्दल आम्ही काहीही सांगू शकत नाही. पण बिग बॉसचा अंदाज आता बदलला आहे.’

‘पूर्वी बिग बॉस म्हणायचे बिग बॉसला वाटत आहे की… पण आता बिग बॉसला माबिती आहे… म्हणजे भूतकाळात काय झालं आहे. वर्तमान कसं असेल आणि भविष्यात काय होणार? सर्व काही बिग बॉसला माहिती असणार आहे.’ घराचा व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांची उत्सुकता देखील शिगेला पोहोचली आहे.

बिग बॉसच्या घरात यंदाच्या वर्षी काय असेल खास?

ओमंग कुमार म्हणाले, आम्ही बिग बॉसच्या घराला गुहा असलेलं हॉटेल बनवलं आहे. ही एक प्राचीन गुहा आहे, परंतु या सेटमध्ये पंचतारांकित रिसॉर्टच्या सर्व सुविधांचा समावेश करण्यात आला आहे. याचा अर्थ, एका बाजूने पाहिल्यास, येथे आपण भूतकाळ तसेच भविष्य देखील पाहू शकतो. यंदाच्या वर्षी बिग बॉसच्या वेगळेपण असणार आहे.

बिग बॉसच्या घरातील जेल देखील वेगळ्या रुपात तयार करण्यात आलं आहे. यंदाच्या वर्षी जेल किचन आणि बेडरुमच्या मध्ये असणार आहे. त्यामुळे स्पर्धक जेलकडे दुर्लक्ष करु शकत नाहीत. सुरुवातीला स्पर्धकांना घरात अवघडल्या सारखं होईल, कारण जागा पूर्वीपेक्षा वेगळी आणि हटके असणार आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.