बिग बॉस 19: बिग बॉसच्या घरात चिकनवरून युद्ध सुरू, भुकेमुळे या स्पर्धकाचा राग अनावर
बिग बॉस 19 हा शो सुरु होऊन आता 2 दिवस झाले आहेत. पहिल्याच दिवशी स्पर्धकांमध्ये जेवणावरून वाद झाल्याचं पाहायला मिळालं. शोच्या दुसऱ्या दिवशी देखील घरात चिकनवरून वाद झाला. त्याचा प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉस 19 हा शो सुरु होऊन आता 2 दिवस झाले आहेत. पहिल्याच दिवशी बिग बॉसमधून एक स्पर्धक घराबाहेरही झाला आहे. 16 स्पर्धकांसह सुरू झालेल्या या शोने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दोनच दिवसात धुमाकूळ घातला आहे. तसेच आता घरातील सदस्यांचे एकमेकांसोबत खटके उडताना दिसत आहेत. यातील जास्त वाद हे जेवणावरूनच होताना दिसत आहेत. या सीझनच्या सुरुवातीला एका स्पर्धकाने भुकेमुळे वाद घातलेला पाहायला मिळालं. त्याचा प्रोमो येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.ही स्पर्धक आहे नेहल चुडासमाला.
बिग बॉसच्या घरात चिकनवरून युद्ध
बिग बॉस 19 चा एक नवीन प्रोमो समोर आला आहे. त्यात शोमध्ये पहिल्या दिवशी ऑमलेटवरून वाद झाला होता. तर आता चिकनवरून युद्ध सुरू आहे. हे सर्व त्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आलं आहे. चिकन न मिळाल्याने नेहल चुडासमाने तिचा प्रचंड राग व्यक्त करत ती चिडून म्हणाली की, “आता मी जेवण बनवणार नाही. प्रत्येकाने पनीर किंवा अंडी बनवून पोट भरावं”
नेहल वादानंतर बागेत बसून रडताना दिसली.
प्रोमोमध्ये एक भावनिक क्षण देखील पाहायला मिळतोय. जेव्हा नेहल रागावल्यानंतर बागेत बसून रडताना दिसली. प्रोमोमध्ये जेवाबद्दलचा किंवा चिकनबद्दलचा तिचा राग पाहता सर्वांनाच आश्चर्य वाटलं. कारण बिग बॉसच्या चाहत्यांना तिचा राग येण्याचा स्वभाव वाटला नव्हता. येणाऱ्या नवीन भागात घरातील सदस्य हा मुद्दा कसा उपस्थित करतात हे पाहणे रंजक ठरणार आहे.
Ghar mein phir ek baar khaane pe bana mudda, kya Nehal Chudasama ka bhook ke kaaran chadhega paara? pic.twitter.com/Dx0MpwqyiG
— BBTak (@BiggBoss_Tak) August 26, 2025
कोण आहे बिग बॉस 19 ची स्पर्धक नेहल चुडासामा?
नेहल ही फिटनेस कन्सल्टंट आहे. ती फिटनेस कोच म्हणून काम करते. तिने अनेक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन देखील केले आहे. सध्या ती बिग बॉस 19 मधील तिच्या प्रवेशामुळे चर्चेत आहे. नेहल भावुक झालेली पाहून तिचे चाहते थोडे दुःखी झाले आहेत. सध्या सलमान खान ‘वीकेंड का वार’ मध्ये याबद्दल बोलणार की नाही हे पाहणे रंजक ठरणार आहे.
