
Bigg Boss 19: ‘बिग बॉस 19’ च्या घरातील स्पर्धक तान्या मित्तल कायम सर्वांसमोर तिच्या श्रीमंतीचा देखावा करत असते. सोशल मीडियावर देखील तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात. पण आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. तान्या मित्तल हिच्या भावावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तान्या मित्तल हिचा भाऊ अमितेश मित्तल याच्यावर जीवे मारण्याची धमकी देण्याचे आरोप करण्यात आले आहेत. हे आरोप सोशल मीडिया इन्फ्लुएंसर विश्वम पंजवानी याने लावले आहे. एवढंच नाही तर, पोलिसांत तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे.
विश्वम पंजवानी याने दाखल केलेल्या तक्रारीनुसार, को एक कंटेंट क्रिएटर आणि विनोदी व्हिडीओ तयार करत सोशल मीडियावर पोस्ट करत असतो. बिग बॉसमध्ये तान्या मित्तलने सांगितलेल्या गोष्टींबद्दल त्याने काही व्हिडिओ पोस्ट केले, ज्यामुळे तान्याचा भाऊ अमितेश संतापला आणि तो विश्वम पंजवानीच्या घरी आला. एवढंच नाही तर, अमितेश याने इन्फ्लुएंसर धमकावलं आणि जीवे मारण्याची धमकी दिली.
विश्वम पंजवानी याने एसपी कार्यालय आणि माधोगंज पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. विश्वम म्हणाला की, माझ्या जीवाला धोका आहे आणि दोषी लोकांवर कारवाई झाली पाहिजे. दाखल केलेल्या तक्रारीत इन्फ्लुएंसर म्हणाला, ‘मझ्या जीवाला काहीही झालं तर, त्याला जबाबदार तान्या मित्तल आणि तिचा भाऊ अमितेश मित्तल असणार आहे.’
याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इन्फ्लुएंसर विश्वम पंजवानी याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. तर याप्रकरणी अधिक तपास सुरु आहे… असं देखील पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे याप्रकरणी पुढे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तान्या मित्तल हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, तान्या बिग बॉसच्या घरात कायम तिच्या श्रीमंतीबद्दल सांगत असते. जे घरातल्या अनेकांना आवडत नाही. एवढंच नाही तर, काहीही झालं तर तान्या लगेच भावूक होते आणि रडू लागते ज्यामुळे तान्याला ट्रोल देखील केलं जातं. सोशल मीडियावर तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.