Katrina Kaif Pregnant: कतरिना कैफ आई होणार, या महिन्यात देईल पहिल्या बाळाला जन्म!
Vicky Kaushal-Katrina Kaif: विकी कौशल आणि कतरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपल आहे. 2021 मध्ये दोघांनी शाही थाटात लग्न केलं. दोघांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता लग्नाच्या 4 वर्षांनंतर कतरिना पहिल्या बाळाला जन्म देईल... अशी चर्चा सर्वत्र जोर धरत आहे.

Vicky Kaushal-Katrina Kaif: अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांत्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. दोघांबद्दल अनेक चर्चा रंगत असतात. आता विकी आणि कतरिना लग्नाच्या 4 वर्षांनंतर पहिल्या बाळाचं जगात स्वागत करणार अशी चर्चा जोर धरत आहे. याबद्दल कतरिना आणि विकी यांनी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी रंगणाऱ्या चर्चा सत्य आहे… असं सांगितलं आहे. याच वर्षी कतरिना आई होणार असं देखील सांगण्यात आलं आहे.
प्रेग्नेंसीच्या अफवा पसरल्यापासून कतरिना प्रसिद्धीपासून दूर आहे. अभिनेत्रीच्या जवळच्या सूत्रांनी सांगितले की तिला एक उत्तम आई व्हायचं आहे आणि बाळाच्या आगमनानंतर ती दीर्घ प्रसूती विश्रांती घेईल… ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात अभिनेत्री पहिल्या बाळाला जन्म देईल… असं देखील सांगण्यात येत आहे. पण यावर अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
View this post on Instagram
विकी कौशलने दिलेली प्रतिक्रिया…
‘बॅड न्यूज’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च दरम्यान विकी कौशल याला पत्नी कतरिना हिच्या प्रेग्नेंसीबद्दल विचारण्यात आलं होतं. यावर विकी म्हणाला होता, ‘आनंदाची बातमी असेल तर आम्हाला तुमच्यासोबत शेअर करायला नक्कीच आवडेल. पण सध्या पसरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका… सध्या ‘बॅड न्यूड’चा आनंद घ्या… जेव्हा ‘गुडन्यूज असेल तेव्हा नक्कीच सर्वांसोबत शेअर करायला आवडेल…’ असं देखील अभिनेता म्हणाला होता.
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांचं लग्न
विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्नाचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. 2021 मध्ये शाही थाटात विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित होते.
कतरिना हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, विकी कौशल याच्यासोबत लग्न करण्याआधी अभिनेत्रीचं नाव अभिनेता सलमान खान आणि अभिनेता रणबीर कपूर यांच्यासोबत देखील जोडण्यात आलं. कतरिना आणि रणबीर यांना एकत्र अनेक ठिकाणी स्पॉट देखील करण्यात आलं. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला. ब्रेकअपनंतर रणबीर याने अभिनेत्री आलिया भट्ट हिच्यासोबत लग्न केलं.
