AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस 19 च्या ग्रँड प्रीमियरला उरलेत काही तास, शो कधी आणि कुठे पाहू शकाल? वाइल्डकार्ड सरप्राईजही

बिग बॉस 19 च्या ग्रँड प्रीमियरसाठी आता फक्त काही तास उरले आहेत. सलमान खान पुन्हा एकदा या सीझनचे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज आहे. बिग बॉस 19 चा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. त्यामुळे सलमान खानची पुन्हा एन्ट्री आणि स्पर्धक यांच्याबद्दल प्रेक्षकांना फारच उत्सुकता आहे. तर या रिअॅलिटी शोचा ग्रँड प्रीमियर कधी आणि कुठे पाहता येईल तसेच स्पर्धक कोण असतील हे जाणून घेऊयात.

बिग बॉस 19 च्या ग्रँड प्रीमियरला उरलेत काही तास, शो कधी आणि कुठे पाहू शकाल? वाइल्डकार्ड सरप्राईजही
Bigg Boss 19 Grand Premiere, Date, TimeImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 23, 2025 | 4:17 PM
Share

टीव्हीवरील सर्वात प्रसिद्ध रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या ‘बिग बॉस’च्या 19 व्या सीझनची सर्वजणच उत्सुकतेने वाट पाहत आहेत. यावेळी कोणते स्पर्धक पाहायला मिळणार, कोणता नवा ड्रामा पाहायला मिळणार अशा अनेक गोष्टींबद्दल प्रेक्षकांना उत्सुकता आहे. तसेच बिग बॉस 19 च्या ग्रँड प्रीमियरची देखीसल सर्वजण वाट पाहत आहेत.

बिग बॉस 19 च्या ग्रँड प्रीमियरसाठी आता फक्त काही तास उरले आहेत. सलमान खान पुन्हा एकदा या सीझनचे सूत्रसंचालन करण्यासाठी सज्ज आहे. बिग बॉस 19 चा प्रोमो देखील रिलीज झाला आहे. सलमान खानला त्याच्या स्टाईलमध्ये बिग बॉसचे सुत्रसंचालन करण्यासाठी सर्वजणच उत्सुक आहेत. दरम्यान, या रिअॅलिटी शोचा ग्रँड प्रीमियर कधी आणि कुठे पाहता येईल तसेच स्पर्धक कोण असतील हे जाणून घेऊयात.

‘घरवालों की सरकार’ थीम 

जसं की टीझरमध्ये आणि प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे यावेळी बिग बॉसची एक नवीन थीम पाहायला मिळणार असल्याचा अंदाज आहे. यावेळी शोची थीम ‘घरवालों की सरकार’ आहे, ज्यामध्ये घरातील सदस्य ‘सत्ताधारी पक्ष’ आणि ‘विरोधी पक्ष’ मध्ये विभागून सत्तेसाठी लढतील. या सीझनचे स्वरूप पूर्णपणे राजकीय शैलीत ठेवण्यात आले आहे. घरात दर आठवड्याला सत्ताधारी आणि विरोधी पक्षात सत्तेच्या खुर्चीसाठी लढाई होणार. जर ती सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असेल तर प्रेक्षकांना प्रत्येक भागात नवीन रणनीती, गटबाजी आणि जोरदार संघर्ष पाहायला मिळतील हे स्पष्ट आहे.तसचे खेळामध्ये देखील अनेक वेगवेगळे ट्वीस्ट आणि टर्न असण्याची शक्यता आहे. त्यामुळे बिग बॉस 19 एका नव्या अन् रंजक गोष्टींसोबत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहे.

बिग बॉस 19चे स्पर्धक

बिग बॉस 19 साठी सध्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या सेलिब्रिटींमध्ये शहनाज गिलचा भाऊ शहबाज, अभिनेत्री अशुनर कौर, आवाजची मैत्रीण नगमा मिराजकर, प्रभावशाली पायल गेमिंग, अभिनेत्री हुनर ​​हली गांधी, अनुपमा फेम गौरव खन्ना, बसीर अली, नेहल चुडासमा, संगीतकार अमल मलिक, गायक श्रीराम चंद्र, शफाक नाज, अभिषेक बजाज आणि कंटेंट क्रिएटर तान्या मित्तल यांचा समावेश असल्याचं म्हटलं जात आहे. तथापि, शोमध्ये कोणते सेलिब्रिटी दिसतील आणि कोण दिसणार नाहीत हे प्रेक्षकांच्या वोटींगवर अवलंबून आहे. कारण यावेळी निर्मात्यांनी स्पर्धकांची निवड करण्यासाठी राजकारणाच्या थीमवर मतदान सुरू ठेवले आहे.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

वाइल्डकार्ड सरप्राईज

बिग बॉसचा अजून एक रंजत भाग असतो तो म्हणजे वाइल्डकार्ड एन्ट्री. स्पर्धकांप्रमाणेच वाइल्डकार्ड एन्ट्री देखील तेवढीच महत्त्वाची असते. वाइल्डकार्ड एन्ट्रीमध्ये नेहमी काहीना काही प्रेक्षकांसाठी सरप्राईज असतं. यावेळी माइक टायसन आणि WWE सुपरस्टार द अंडरटेकर सारखे आंतरराष्ट्रीय नावं देखील या शोमध्ये वाइल्डकार्ड एन्ट्री म्हणून येणार असल्याचं म्हटलं जात आहे. आणि खरंच असं झालं तर शोची जागतिक लोकप्रियता आणखी वाढेल यात वादच नाही.

ग्रँड प्रीमियर कधी आणि कुठे पाहायचा?

बिग बॉस 19 चा ग्रँड प्रीमियर उद्या म्हणजे 24 ऑगस्ट 2025 रोजी रात्री 9 वाजता सुरू होईल. तुम्ही तो जिओ हॉटस्टारवर रात्री 9 वाजता आणि कलर्स टीव्हीवर रात्री 10.30 वाजता पाहू शकता. यावेळी सलमान खानची नव्या थीमनुसार होणारी एन्ट्री आणि स्पर्धकांची सगळेच वाट पाहत आहेत.

मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.