Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात पलटला मोठा गेम, थेट बिग बॉसने घरातील टॉप 5 फायनलिस्टलाच…

Bigg Boss 19 Finale : बिग बॉस 19 च्या फिनालेला अवघे काही तास दिवस शिल्लक आहेत. त्यामध्येच घरात मोठे बदल होताना दिसत आहेत. बिग बॉस 19 ला त्यांचे 5 फायनलिस्ट मिळाले आहेत.

Bigg Boss 19 : बिग बॉसच्या घरात पलटला मोठा गेम, थेट बिग बॉसने घरातील टॉप 5 फायनलिस्टलाच...
Bigg Boss 19 Finale
Updated on: Dec 03, 2025 | 11:39 AM

बिग बॉस 19 ची चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळाली. मागील काही दिवसांपासून हे सीजन धमाका करताना दिसले. आता बिग बॉस 19 चा फिनाले अवघ्या काही दिवसांवर आला. 7 डिसेंबर 2025 ला बिग बॉस 19 ला त्याचा विजेता मिळेल. दरम्यान, बिग बॉसच्या घरात मोठा गेम पलटला आहे. बिग बॉसने घरातील सदस्यांना असेंबली रूममध्ये बोलावले आणि बिग बॉस 19 चा विजेता कोण होणार? हा प्रश्न विचारला. यादरम्यान फरहाना भट्ट हिने तान्या मित्तलचे नाव घेतले. तान्या मित्तल हिने गाैरव खन्नाचे नाव घेतले. गाैरव खन्ना याने प्रणित मोरेचे. अमाल मलिक याने प्रणित मोरे आणि प्रणित मोरे याने गाैरव खन्नाचे नाव घेतले. तान्या, फरहाना आणि गाैरव खन्ना यांना एक एक वोट मिळाले. मालती चहर ही दोन दिवसांमध्ये बिग बॉसच्या घरातून बाहेर होईल.

अमाल मलिक, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, तान्या मित्तल आणि मालती चहर यांना नामांकन देण्यात आले.  काम सुरू होताच घरात शांतता पसरली. मालती चहरची पाळी आली तेव्हा तिने तिचा फोटो बॉक्समध्ये ठेवला आणि लगेचच लाल लाईट चमकला. यावरून स्पष्टपणे दिसून आले की मालती चहरला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार. मालती ही बिग बॉसच्या घरात जोरदार हंगामा करताना दिसली.

मालती ही भारतीय क्रिकेट दिपक चहर याची बहीण आहे. बिग बॉसच्या फिनालेला अवघे काही दिवस शिल्लक असताना मालती चहर हिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मालतीला बिग बॉसच्या घरातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. बिग बॉसमध्ये सर्वकाही अप्रत्याशित आहे आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे.

मालती बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्याने बिग बॉस 19 ला त्यांचे टॉप 5 विजेते मिळाले आहेत. अंतिम फेरीपूर्वी, तान्या मित्तल, फरहाना भट्ट, गौरव खन्ना, अमाल मलिक आणि प्रणित मोरे यांनी त्यांचे स्थान निश्चित केले आहे. यापैकीच एकाच्या गळ्यात बिग बॉस 19 च्या विजेतेपदाची माळ पडेल. बिग बॉसचा विजेता कोण होणार यावरून चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ ही बघायला मिळतंय.