Bigg Boss 19 : सलमाननेच केली बिग बॉसची पोलखोल; सगळंच ऑन एअर..

Bigg Boss 19 : सूत्रसंचालक सलमान खाननेच बिग बॉसची पोलखोल केली आहे. सलमानवर पक्षपातीचा आरोप करण्यात आला. या आरोपांवर उत्तर देताना त्याने बिग बॉसची पोलखोल केली. सलमानचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आहे.

Bigg Boss 19 : सलमाननेच केली बिग बॉसची पोलखोल; सगळंच ऑन एअर..
सलमान खान
Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 12, 2025 | 11:45 AM

‘बिग बॉस 19’ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. ‘वीकेंड का वार’ एपिसोडमध्ये सलमान खान काही स्पर्धकांची शाळा घेतो तर काहींना सल्लेसुद्धा देतो. यंदाच्या सिझनमध्ये सलमानवर गायक अमाल मलिकची बाजू घेतल्याचा आरोप करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या एका एपिसोडमध्ये त्याच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करण्यात आला. सलमान अमालवर कधीच टीका करत नाही, त्याच्याबद्दल नेहमीच चांगलं होतो, असं म्हटलं गेलं. यावर खुद्द सलमानने उत्तर दिलं.

रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात ‘बिग बॉस 19’च्या ‘वीकेंड का वार’चा एपिसोड पाहून प्रेक्षकांनी तक्रार केली सलमानने अमाल मलिकला त्याच्या चुकांसाठी फटकारलं नाही. या एपिसोडमध्ये अमाल शिवीगाळ करतो आणि रागात बोलतो. आता सलमानने बिग बॉसच्या घरातील स्पर्धकांना विचारलं की शोदरम्यान त्याने सर्वाधिक टीका कोणावर केली? त्यावर सर्वांनी अमाल मलिकचं नाव घेतलं. मग सलमान म्हणाला, “होय, मी अमाललाच सर्वाधिक फटकारलंय. परंतु प्रत्येक गोष्ट ऑन एअर जात नाही. मी त्याला जे काही म्हटलंय, त्या खासगी गोष्टी आहेत. या गोष्टी मी कोणालाच बोलणार नाही. याचा अर्थ असा नाही की मी त्याच्याशी पक्षपातीपणे वागतोय.”

सलमानने यावेळी त्यांनाही सडेतोड उत्तर दिलं, ज्यांनी त्याच्यावर अमाल आणि कुनिका सदानंद यांची सतत बाजू घेत असल्याचा आरोप केला होता. “माझा उद्देश हा सर्व स्पर्धकांचं मार्गदर्शन करण्याचा आणि त्यांचा खेळ सुधारण्याच आहे. मी त्यांची बाजू अजिबात घेत नाही”, असं त्याने स्पष्ट केलं. अभिषेक बजाजचं त्याच्या परफॉर्मन्समुळे प्रचंड कौतुक झाल्याचंही त्याने यावेळी सांगितलं. प्रत्येक स्पर्धक घरात कसा वावरतोय, त्याचा राग, इतरांशी किती जुळवून घेतोय.. यावरून त्याचा परफॉर्मन्स ठरवला जातो, त्यात कोणताच पक्षपात होत नसल्याचंही सलमानने म्हटलंय.

बिग बॉसच्या घरात नुकतीच वाइल्ड कार्ड एण्ट्री झाली. मालती चाहरचं बिग बॉसच्या घरात आगमन झालंय. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये तिला इतर स्पर्धकांनी रेड आणि ग्रीन फ्लॅग दिले. मालतीला आठ ग्रीन आणि सहा रेड फ्लॅग मिळाले.