Bigg Boss 19 : ‘बिग बॉस 19’ मध्ये मोठा ट्विस्ट, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बहीणीची एंट्री, कोण गेलं बाहेर ?

यावेळी, बिग बॉस 19 मध्ये यंदा वीकेंड का वार खूप गाजला. एल्विश यादवने त्याच्या खास शैलीत इतर स्पर्धकांची वाट लावली तर वाइल्ड कार्ड एन्ट्रीने घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसला. एक खास व्यक्तीच्या एंट्रीमुळे अख्ख्या घपरातील पूर्णपणे बदलून टाकले.

Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मध्ये मोठा ट्विस्ट, प्रसिद्ध क्रिकेटपटूच्या बहीणीची एंट्री, कोण गेलं बाहेर ?
बिग बॉस 19
| Updated on: Oct 06, 2025 | 10:44 AM

टीव्ही वरील सर्वात रंजक शो असलेल्या बिग बॉस 19 ची रंगत दिवसगणिक वाढतच चालली आहे. सलमान खान होस्ट असलेल्या या शोमध्ये रोज काही ना काही घडतच असतं. तर यंदाच्या आठवड्यात, सलमानने वीकेंड का वार या कार्यक्रमात अनेक स्पर्धकांना चांगलंच लेक्चर देत सुनावलं. एवढंच नव्हे तर बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता एल्विश यादव देखील त्यात सामील झाला. दरम्यान, या शोमध्ये आता वाइल्ड कार्ड एंट्रीचीही घोषणा करण्यात आली.

कोण आहे वाईल्ट कार्ड स्पर्धक ?

रविवारी झालेल्या ‘वीकेंड का वार’ या कार्यक्रमात भारतीय क्रिकेटपटू दीपक चहर पाहुणा म्हणून आला होता. तो तर सलमान खानसोबत क्रिकेटही खेळला. त्याला पाहून अनेकांना आश्चर्य वाटलं, पण खरंतर तो त्याची बहीण मालती चहरला सोडायला आला होता. तिने बिग बॉस १९ मध्ये दुसरी वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश केला. यावेळी मालतीने तिच्या अद्भुत डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांची मने जिंकली.

एल्विश यादवने कोणाला केलं रोस्ट ?

तर रावसाहेब म्हणून प्रसिद्ध असलेला एल्विश यादव हे बिग बॉस 19 च्या सेटवर वीकेंड का वार या कार्यक्रमात पाहुणा म्हणून आला होता. त्याने सर्व घरातील सदस्यांना “अँटीडोट” हा टास्क खेळायला लावला, जिथे प्रत्येकजण दुसऱ्या घरातील सदस्याला पेय दिलं. कुनिकाने तान्याचे नाव घेतले तर नेहलने झीशान कादरीचा उल्लेख केला. दरम्यान, एल्विशने तान्याला फसवणूक करणारी म्हटलं.

 

कोण झालं बेघर ?

या आठवड्यात, बिग बॉस 19 मध्ये आठ स्पर्धक हे नॉमिनेटेड होते. यामध्ये अमाल मलिक, नेहल चुडासामा, कुनिका सदानंद, अश्नूर कौर, नीलम गिरी, प्रणित मोरे, तान्या मित्तल आणि जीशान कादरी यांचा समावेश होता. यादरम्यान सलमान खानने एक गेम खेळला. त्याने इतर स्पर्धकांना सुरक्षित घोषित केले आणि नीलम गिरीला घराबाहेर पडण्यास सांगितले. पण ते ऐकून ती तर रडू लागली. मात्र, नंतर सलमानने नीलमलाही सुरक्षित घोषित केले आणि झीशानला निघून जाण्यास सांगितले. मात्र ती पण एक मजाच होती कारण, नंतर सलमान खानने जाहीर केले की या आठवड्यात कोणतेही एलिमिनेशन होणार नाही.

तर वाईल्ट कार्ड म्हणून मालतीने घरात प्रवेश केल्यानंतर, इतर स्पर्धक तिच्या मागे बोलू लागले. यादरम्यान, तान्या मित्तलने नीलम गिरीला सांगितले की तिला मालती अजिबात आवडत नाही. झीशान कादरी, शाहबाज बदेशा आणि मृदुल तिवारी यांनी मालतीला तिचं सामान नीट लावण्यास मदतही केली.