बिग बॉस 19 चा विजेता गौरव खन्ना याचा खळबळजक खुलासा, म्हणाला, निर्मात्यांनी अजूनही..
Bigg Boss : बिग बॉस 19 संपले असून गाैरव खन्ना हा बिग बॉस 19 चा विजेता झाला. गाैरव युट्यूबच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. नुकताच गाैरव खन्ना याने बिग बॉस 19 बद्दल केलेल्या खुलाशानंतर मोठी खळबळ उडाली आहे.

बिग बॉस सीजन 19 संपून काही दिवस झाले आहेत. गाैरव खन्ना हा बिग बॉस 19 चा विजेता ठरला. सुरूवातीपासूनच बिग बॉसच्या घरात धमाकेदार गेम खेळताना गाैरव खन्ना दिसला. गाैरव खन्ना याने त्याच्या आतापर्यंतच्या करिअरमध्ये अनेक हीट मालिकांमध्ये धमाकेदार भूमिका केल्या. यासोबतच गाैरव खन्ना शो होस्ट करतानाही दिसतो. गाैरव खन्ना हाच बिग बॉस 19 चा विजेता होईल असे सांगितले जात होते. सलमान खान याने गाैरव खन्ना याच्या नावाची घोषणा केली. काही दिवसांपूर्वीच गाैरव खन्ना याने आपले युट्यूब चॅनल सुरू केले. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्याला मोठा झटका बसला. त्याचे युट्यूब चॅनल बंद पडले. आता तो पुन्हा युट्यूबवर सक्रिय झाला. बिग बॉसच्या घरातील गाैरव खन्ना याचा मित्र आणि कॉमेडियन प्रणित मोरे याने हे युट्यूब चॅनल काढण्यास मदत केली.
गाैरव खन्ना हा आपल्या नवीन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून खास गोष्टी प्रेक्षकांसोबत शेअर करतो. नुकताच गाैरव खन्ना हा अंबानी कुटुंबाच्या एका कार्यक्रमात होस्ट करताना दिसणार आहे. याबद्दल सविस्तर बोलताना गाैरव खन्ना दिसला. हाय प्रोफाईल रिलायंस यांचा फॅमिली शो मी होस्ट करणार आहे. मी पहिल्यांदाच इतका मोठा कार्यक्रम होस्ट करत आहे. हे माझ्यासाठी खरोखरच खूप वेगळे आहे.
स्क्रीप्ट खूप जास्त मोठी आहे. मी घोड्यावर बसून स्टेजवर जाणार आहे, बरेच काही आहे. धीरूबाई अंबानी यांच्या जयंतीच्या कार्यक्रमला होस्ट करत असल्याचेही स्पष्ट त्याने केले. गाैरव खन्ना हा प्रणित मोरेला हॉटेलमध्ये जेवणाकरिता भेटतो. यादरम्यान गाैरव खन्ना हा प्रणित मोरे याला मिठाईचा एक डब्बा देतो. यावर गाैरव खन्ना याला प्रणित मोरे म्हणतो की, मला बिग बॉसच्या घरात जिंकलेली कार गिफ्ट दे… यावर जोरात हसत गाैरव खन्ना म्हणतो की, ती कार अजून मला पण मिळाली नाही.
गाैरव खन्ना याचे बोलणे ऐकून अनेकांना मोठा धक्का बसला. गाैरव खन्ना याला बिग बॉसच्या विजेत्याच्या रक्कमेसह एक कारही मिळणार होती. मात्र, ती कारण अजून मिळाली नसल्याचे स्पष्ट सांगताना गाैरव खन्ना दिसला. गाैरव खन्ना याचे हे बोलणे एकून अनेकांना मोठा धक्का बसला. विजेत्याला कार मिळणार असल्याची घोषणा करूनही गाैरव खन्ना याला कार न मिळाल्याने विविध चर्चा रंगताना दिसत आहेत.
