Bigg Boss 20 : सलमान खानसमोरच माही विजच्या डोळ्यांत अश्रू, ‘वीकेंड का वार’ मध्ये काय घडणार ?
Bigg Boss 20 : स्वत: सलमान खान हा माही विजचं सत्य उघड करणार आहे. वीकेंड का वार मध्ये का इमोशनल झाली स्पर्धक, नेमकं काय घडलं ? घ्या जाणून

सलमान खान (Salman khan) होस्ट करत असलेल्या बिग बॉस 20 (Bigg Boss 20) या रिॲलिटी शोचा आणखी एक ‘वीकेंड का वार’ आला आहे. गेल्या आठवड्यात घरात जे मुद्दे महत्वाचे ठरले,त्या सर्वांबद्दल सलमान खान आता बोलताना दिसणार आहे. एवढंच नव्हे तर माही विज आणि यंग डीएसएच्या मुद्यावरही वीकेंड का वारमध्ये चर्चा होणार आहे. माही विजवर जे गंभीर आरोप लावले त्यानंतर सलमान तिची साथ देणार का यंग डीएसएला सपोर्ट करणार ते आज स्पष्ट होईल. एका रिपोर्टदरम्यान सलमानशी संवाद साधताना माही विज अचानक इमोशनल झाली. जे भांडण झालं आणि सलमान त्यावर जो निर्णय देईल, त्यानंतर नेमका काय निकाल लागेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. आजच्या वीकेंड का वारमध्ये भाईजान नेमकं काय बोलणार याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
काय आहे नेमकं प्रकरण ?
एका गैरसमजुतीमुळे आणि त्यानंतर जे आरोप करण्यात आले, त्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू झाला. माही विजने त्याच्यापाठीमागे काही विधानं केली आणि शिवीही दिली असा यंग डीएसएचा दावा आहे. ‘वीकेंड का वार’दरम्यान सलमान खानने माही विजशी थेट संवाद साधत हा संपूर्ण प्रकार नेमका काय होता आणि याबाबत तिची काय बाजू आहे, असं विचारलं. तू खरंच यंग डीएसएला शिवी दिली होतीस का ? असं सलमानने थेट तिला विचारं. मात्र त्यावर माहीने दिलेलं उत्तर यंग डीएसएसएसाठी खूप धक्कादायक ठरू शकतं.
माहीने दिलं स्पष्टीकरण
मी यंग डीएसएसला शिवी दिलेली नाही असं माहीने सलमानसमोर स्पष्टपणे सांगितलं. तसेच मी यंगसाठी एका विशिष्ट शब्दाचा वापर केला होता, मात्र तो एक वाक्प्रचार होता, यंग डीएसएसाठी वापरलेला कोणताही अपशब्द नव्हता, अअसंही तिने ठामपणे सांगितलं. माही आपली बाजू मांडत असतानाच ईशा रिखी तिच्या समर्थनार्थ पुढे आली आणि माही नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न करत होती हेही तिने स्पष्ट केलं. त्यानंतर सलमानने माहीला सपोर्ट केला. माहीने असं काही म्हटलंच नव्हतं, ज्यामुळे तिला घेरलं जातंय, असं सलमान म्हणाला. माहीच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला, असही सलमानने या वीकेंडा का वार दरम्यान सांगितलं.
दमदार होणार एपिसोड
संपूर्ण घरासमोर सलमानने माहीला सपोर्ट केला आणि ती निर्दोष असल्याचं सांगितलं यामुळे माही विज इमोशनल झाली. तिच्या डोळ्यात अश्रू आले. एकंदरच आजचा वीकेंडचा वार अतिशय दमदाक ठरणार असूून चाहत्यांचं भरपूर मनोरंजन होणार आहे, असं दिसतंय.
