Bigg Boss फेम अब्दु रोजिकला दुबई विमानतळावर अटक, त्याच्यावर गंभीर आरोप

Bigg Boss fame Abdu Rozik: Bigg Boss मुळे चर्चेत आलेल्या अब्दु रोजिकच्या अडचणीत मोठी वाढ, गायकाला दुबई विमानतळावर झाली अटक, गंभीर आहे प्रकरण..., सध्या सर्वत्र अब्दु रोजिक याची चर्चा...

Bigg Boss फेम अब्दु रोजिकला दुबई विमानतळावर अटक, त्याच्यावर गंभीर आरोप
फाईल फोटो
| Updated on: Jul 13, 2025 | 2:13 PM

Bigg Boss fame Abdu Rozik: ‘बिग बॉस 16’ स्पर्धक आणि गायक अब्दू रोजिक याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. अब्दू रोजिक याला दुबई विमानतळावरून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दू रोजिक याच्यावर चोरीचे आरोप आहेत. शनिवारी अब्दू रोजिक याला अटक करण्यात आली आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अब्दू रोजिक याची चर्चा रंगली आहे.

अब्दु रोजिकला चोरीच्या आरोपाखाली अटक

दुबई विमानतळावर चोरीच्या आरोपाखाली अब्दू रोजिकला अटक करण्यात आली आहे. पण, गायकावर काय चोरीचा आरोप आहे हे अद्याप कळलेलं नाही. अब्दूच्या टीमने दिलेल्या माहितीनूसार, “आम्हाला फक्त एवढंच माहिती आहे की त्याला चोरीच्या आरोपाखाली ताब्यात घेण्यात आलं आहे.”

 

कोण आहे अब्दू रोजिक?

अब्दु रोजिक वयाच्या अवघ्या 21 व्या वर्षी एक मोठा सेलिब्रिटी बनला आहे. त्याने सलमान खानच्या सर्वात वादग्रस्त शो ‘बिग बॉस 16’ मध्येही भाग घेतला होता. या शोमुळे अब्दु प्रत्येक घरात प्रसिद्ध झाला. शिवाय अब्दु रोजिक सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. अब्दु रोजिक दुबईत राहतो आणि तेथे त्याचं आलिशान घर आहे.

 

 

अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकला अब्दू रोजिक

सांगायचं झालं तर, तो अनेक वेळा अडचणीत आला आहे. भारताच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 2024 मध्ये एका हॉस्पिटॅलिटी फर्मशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अब्दू रोजिकची चौकशी केली. या प्रकरणानेही अब्दूची सर्वत्र चर्चा सुरु होती. पण गायक यात दोषी आढळले नाही. आता त्याच्या अटकेमुळे त्याचे चाहते खूप नाराज आहेत. अब्दू कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.