
Bigg Boss Fame Actress: बिग बॉस ओटीटी फेम अभिनेत्री आकांक्षा पुरी कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या खासगी आयुष्यावर मोठा खुलासा केला. वयाच्या 36 व्या वर्षी आकांक्षा हिने एग्स फ्रिझ केले आहेत. सांगायचं झालं तर, आकांक्षा कायम तिच्या आयुष्याबद्दल मोकळेपणाने बोलत असते. आता देखील तिने एग्स फ्रिझ करण्यास आईने पाठिंबा दिल्याचं सांगितलं आहे. काही वर्षांपूर्वीच अभिनेत्रीने एग्स फ्रिज केले आहेत.
नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्रीने मोठा खुलासा केला आहे. ‘अनेक अभिनेत्री एग्स फ्रिज करतात. पण गुपित ठेवतात कारण चर्चा होईल या भीतीने त्या कोणालाही सांगत नाही. मी एग्स फ्रिज करण्याचा निर्णय घेतला आणि केले… काही मुलींना याबद्दल माहिती देखील नाही.’
‘एग्स फ्रिज केल्यामुळे शरीरात अनेक बदल होतात. शारीरात AMH पातळी असते. ज्यामुळे शरीरात अंड्यांचे उत्पादन कमी होते. किंवा तुमचं शरीर अशा पातळीवर पोहोचते जिथे ते तयार होणं थांबतं. आज आपण अशा काळात आहोत जेथे आपण एग्स फ्रिज करू शकतो आणि मोकळेपणाने यावर बोलत आहे.’
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मला आई व्हायचं असेल तर मी तयार आहे. मला सिंगल मदर म्हणून आयुष्य जगाचं असेल तर ती माझी निवड आहे. आज मी इतकी सक्षम आहे की मला कोणाचीही गरज नाही. जरी तुम्हाला कोणाची साथ मिळाला तरी देखील काही हरकत नाही. मी आता बाळाला जन्म देण्यास सक्षम आहे.’
आकांक्षा म्हणाली की तिच्या आईने तिला या सगळ्यात खूप साथ दिली. अभिनेत्रीची आई म्हणाली की, आमच्याकडे हा पर्याय नव्हता. जर तुमच्याकडे असेल तर ते नक्की करा…. सध्या सर्वत्र अभिनेत्रीच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.
आकांक्षा हिच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.