
Cricketer Mohammed Siraj Love Life: क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांच्या नात्याची चर्चा कायम चाहत्यांमध्ये आणि सोशल मीडियावर रंगत असते. अनेक क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री यांनी संसार देखील थाटला आहे. आता भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे. सिराज ‘बिग बॉस’ अभिनेत्रीला डेट करत अल्याची चर्चा गेल्या कित्येक दिवसापासून रंगली आहे. सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री माहिरा शर्मा आहे.
सांगायचं झालं तर, 2023 मध्ये देखील सिराज आणि माहिरा यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला होता. आता रिलेशनशिपच्या चर्चांवर खुद्द माहिरा हिने मौन सोडलं आहे. चाहत्यांमध्ये रंगलेल्या या चर्चांना कधी अधिक महत्त्व दिलं नाही… असं अभिनेत्री म्हणाली.
पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी कोणाला डेट करत नाही. लोकं माझ्याबद्दल चांगलं किंवा वाईट बोलले तरी मी कधीच गोष्टी स्पष्ट करत नाही. मी अशी व्यक्ती आहे, जी कधीच प्रतिसाद देत नाीह. चाहते कोणासोबत देखील नाव जोडू शकतात. त्या चर्चा आपण थांबवू शकत नाही. मी ज्या अभिनेत्यासोबत काम केलं आहे, त्याच्यासोबत देखील माझ्या नावाची चर्चा रंगली आहे…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.
सांगायचं झालं तर, सिराज याने जेव्हा माहिराचे फोटो गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाईक केले होते, तेव्हापासून दोघांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोर धरला आहे. त्यानंतर रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला की, दोघेही एकमेकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत आणि नातं खाजगी ठेवत आहेत.
एका मुलाखतीत माहिरा आणि सिराज यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर अभिनेत्रीच्या आईने मोठं वक्तव्य केलं. त्या स्पष्ट शब्दांत म्हणाल्या, ‘लोकं काहीही म्हणतात. आज माझी मुलगी सेलिब्रिटी आहे म्हणून तिच्या नावाच्या चर्चा कोणासोबतही रंगलेल्या असतात. अशात आपण चर्चा करणाऱ्यांवर चर्चा विश्वास ठेवला पाहिजे का?’ असा प्रश्न देखील माहिरा हिच्या आईने उपस्थित केला.