Rakhi Sawant Boyfriend:बिग बॉस फेम राखीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा अंकुर; बॉयफ्रेंड आदिल आहे 6 वर्षांनी लहान

Rakhi Sawant Boyfriend:बिग बॉस फेम राखीच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाचा अंकुर; बॉयफ्रेंड आदिल आहे 6 वर्षांनी लहान
राखी सावंत
Image Credit source: tv9

राखीने पुढे सांगितले की, “आमच्या पहिल्या भेटीनंतर एका महिन्याच्या आत आदिलने मला प्रपोज केले. मी त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे आणि खरे सांगायचे तर मी या नात्यासाठी अजिबात तयार नव्हते.

अस्लम अब्दुल शानेदिवाण

|

May 17, 2022 | 11:25 PM

मुंबई : राखी सावंत (Rakhi Sawant) आणि वाद नेहमीच एकमेकांसोबतच असतात. तिच्या निर्दोष व्यक्तिमत्त्वासाठी आणि धाडसी अभिनयासाठी ओळखली जाणारी राखी सावंत आजकाल तिच्या लव्ह लाईफमुळे पुन्हा चर्चेत आहे. बिग बॉस फेम (Bigg Boss Fame) राखीच्या आयुष्यात अनेक वादळं आली त्यात पती रितेशपासून वेगळे होणं हे देखील होतं. त्यानंतर ती एकदम एकटी झाली होती. मात्र पुन्हा एकदा प्रेमाने कोणीतरी आवाज देणारा आला आहे. हो तिच्या आयुष्यात पुन्हा एकदा एकाने प्रवेश केला आहे. ताज्या अपडेटनुसार, राखी सावंत सध्या आदिल खान दुर्राणीला डेट करत आहे. तर नुकतीच राखी तिच्या बॉयफ्रेंड आदिल खान दुर्रानीसोबत (Boyfriend Adil Khan Durrani)स्पॉट झाली होती. राखीने स्वतः कॅमेऱ्यासमोर खुलासा केला की आदिल तिचा बॉयफ्रेंड आहे. टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राखीने सांगितले आहे की, तिचा बॉयफ्रेंड हा तिच्यापेक्षा 6 वर्षांनी छोटा आहे. राखी म्हणते मला वाटते की आदिलला देवाने माझ्यासाठी पाठवले आहे. रितेशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर मी डिप्रेशनमध्ये गेलो. माझी तब्येत ठीक नव्हती आणि अशा कठीण काळात आदिलने माझ्या आयुष्यात प्रवेश केला.

राखी रिलेशनशिपसाठी तयार नव्हती

राखीने पुढे सांगितले की, “आमच्या पहिल्या भेटीनंतर एका महिन्याच्या आत आदिलने मला प्रपोज केले. मी त्याच्यापेक्षा सहा वर्षांनी मोठी आहे आणि खरे सांगायचे तर मी या नात्यासाठी अजिबात तयार नव्हते. पण मलायका अरोरा-अर्जुन कपूर आणि प्रियांका चोप्रा-निक जोनास यांची उदाहरणे हे काही कमी नाहीत. त्यामुळे मलाही यात काही वावागं वाटतं नाही असेही तीने स्पष्ट केले. आदिल म्हणाला की तो माझ्यावर खूप प्रेम करतो आणि मी देखील त्याच्या प्रेमात पडले आहे.

बिझनेसमॅन आहे बॉयफ्रेंड

राखी सावंतचा प्रियकर आदिल हा म्हैसूरचा आहे. त्याच्याबद्दल माहिती देताना राखीने सांगितले की, आदिल हा म्हैसूरचा आहे, तो मला भेटायला मुंबईला येतो. तो एक व्यापारी आहे. आदिलने मला म्हैसूरमध्ये बीएमडब्ल्यू गिफ्ट केली. त्याने मला तिथे बोलावले होते आणि मी तिथे गेले ही होते. वास्तविक आदिल शैलीचा भाऊ आहे. शैली एक मित्र आणि व्यावसायिक भागीदार आहे. शैलीने माझी आदिलशी ओळख करून दिली आणि त्याने माझा नंबरही शैलीकडून घेतला. आमचे फोनवर संभाषण सुरू झाले. पण तरीही मी खूप गोंधळलेली आहे.

हे सुद्धा वाचा

कुटुंबीयांचा नात्याला विरोध

तिच्या गोंधळाबद्दल बोलताना राखी म्हणाली की, मी मनोरंजन क्षेत्रातील आहे. माझ्या चित्रपटांमध्ये किंवा टीव्ही शोमध्ये मी नेहमीच ग्लॅमरस व्यक्तीमध्ये दिसले आहे, माझ्या या प्रतिमेमुळे आदिलचे कुटुंब या नात्याच्या विरोधात आहेत. या बातमीनंतर त्यांच्या घरात वादळ आले. त्याच्या घरच्यांना माझा पेहराव आवडत नाही. पण गरज पडली तर मी स्वतःला बदलायला तयार आहे. तथापि, त्यांच्या बाजूने कोणीही मला बदलण्यास भाग पाडत नाही. मात्र आदिलवर सर्व बाजूंनी दबाव टाकला जात आहे. म्हणूनच मला भीती वाटते, मला मोठ्या कष्टाने प्रेम मिळाले आहे. मला आशा आहे की त्याचे कुटुंब मला स्वीकारेल.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें