Bigg Boss  14 | तूफानी सिनिअर्सला मोठी टक्कर, निक्की तंबोलीकडे घराचे ‘विशेषाधिकार’!

तूफानी सिनिअर्सप्रमाणे अधिकार मिळवणारी निक्की तंबोली (Nikki Tamboli) या पर्वातील पहिली स्पर्धक ठरली आहे.

Bigg Boss  14 | तूफानी सिनिअर्सला मोठी टक्कर, निक्की तंबोलीकडे घराचे 'विशेषाधिकार'!
Harshada Bhirvandekar

|

Oct 11, 2020 | 11:07 AM

मुंबई :बिग बॉस’चे 14वे पर्व सध्या जोशात सुरू आहे. पहिला ‘विकेंड वार’सुद्धा स्पर्धकांसाठी दिलासादायक ठरला आहे. ‘विकेंड का वार’मध्ये स्पर्धकांवर चिडणारा सलमान खान मात्र यावेळेस शांत आणि मस्तीच्या मूडमध्ये होता. आठवडाभराच्या चुकांचा एका दिवसात हिशोब घेणाऱ्या सलमानने यावेळी निक्की तंबोली आणि जास्मीन भसीनची चांगलीच थट्टा केली. याचबरोबर तूफानी सिनिअर्सप्रमाणे अधिकार मिळवणारी निक्की तंबोली (Nikki Tamboli) या पर्वातील पहिली स्पर्धक ठरली आहे. (Bigg Boss latest update Nikki Tamboli Wins Immunity task)

निक्की तंबोली तूफानी सिनिअर्सच्या ‘मर्जीत’

एका टास्कदरम्यान स्पर्धक सारा गुरपालने निक्की तंबोलीचा मेकअपकीट पूर्णपणे तोडून टाकला. निक्की सामान उद्ध्वस्त होऊनही जागची हलली नाही. त्यामुळे हा टास्क तिने जिंकला. निक्कीची (Nikki Tamboli) जिद्द पाहून सगळ्या तूफानी सिनिअर्सनी तिचे कौतुक केले. तर, सिद्धार्थ शुक्लाने तिला नवा मेकअपकीट भेट देणार असल्याचेदेखील सांगितले.

विशेषाधिकार मिळवणारी पहिली स्पर्धक

भागाच्या सुरुवातीस स्पर्धकांसह सलमान खाननेदेखील निक्कीचे कौतुक केले. घरात सगळ्यात सक्रिय स्पर्धक निक्कीच असल्याचे सलमानने म्हटले. विशेषाधिकार मिळवण्यासाठीच्या खेळात पवित्रा पुनिया आणि निक्की तंबोली या दोघी विजेत्या ठरल्या होत्या. मात्र, बिग बॉसने दोघींपैकी एकीची निवड करण्याचा अधिकार तूफानी सिनिअर्सकडे सोपवला. यावर एकमताने निक्कीचे (Nikki Tamboli) नाव घेतले गेल्याने, या पर्वात विशेषाधिकार मिळवणारी निक्की तंबोली पहिली स्पर्धक ठरली आहे. (Bigg Boss latest update Nikki Tamboli Wins Immunity task)

सलमानचा रुबिनाला सल्ला

रुबिना दिलाक आणि अभिनव शुक्ला ही जोडीदेखील या पर्वाचा भाग झाली आहे. रुबिना पहिल्या आठवड्यात घराबाहेरच दिसली. मात्र, अभिनव शुक्ला घरातील खेळात भाग घेत आहे. विशेषाधिकाराच्या खेळात अभिनवदेखील सहभागी झाला होता. मात्र, तो फार काळ टिकू शकला नाही. त्यानंतर अभिनवची अवस्था बघून पत्नी रुबिनाने डॉक्टरांना बोलवण्याची मागणी केली. त्यावरून इतर स्पर्धक जरी तिच्यावर नाराज झाले असले तरी, सलमान खानाने तिचे कौतुक केले आहे. निक्कीनंतर (Nikki Tamboli) रुबिना या घरातील तगडी स्पर्धक असल्याचे त्याने म्हटले आहे. मात्र, तिने स्वतःचा खेळ खेळावा, अभिनवच्या बोलण्यात येऊ नये, असा सल्ला सलमानने रुबिनाला दिला आहे.

‘बीबी मॉल’मध्ये निक्कीकडून जोरदार खरेदी

सलमान खानने सर्व स्पर्धकांना सांगितले की, बीबी मॉल नवीन सदस्यांसाठी खुला होत आहे. खरेदी करण्याची संधी मिळाल्याने निक्की तंबोली प्रचंड आनंदी झालेली दिसली. यानंतर निक्कीने जवळजवळ बीबी मॉलमधील प्रत्येक गोष्ट खरेदी केली. या आठवड्यातील उत्तम कामगिरीमुळे तिला ही खास संधी देण्यात आली होती.

(Bigg Boss latest update Nikki Tamboli Wins Immunity task)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें