AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छोट्या पुढारीचं निधन? हार घातलेले फोटो व्हायरल, नेमकं काय आहे सत्य?

छोटा पुढारी उर्फ घन:श्याम दरोडेने सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत जिवंत असल्याचे सांगितले आहे. तसेच त्याने चाहत्यांचे आभार मानले आहेत. तसेच पुढारीने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

छोट्या पुढारीचं निधन? हार घातलेले फोटो व्हायरल, नेमकं काय आहे सत्य?
Chota PudhariImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 27, 2025 | 4:15 PM
Share

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय शो म्हणून बिग बॉस पाहिला जातो. बिग मराठीच्या पाचव्या सिझनमधून प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेला ‘छोटा पुढारी’ उर्फ घन:श्याम दरोडेचे निधन झाल्याचे म्हटले जात होते. सोशल मीडियावर हार घातलेला फोटो देखील व्हायरल झाला होता. पण आता या सर्व अफवा असल्याचे स्वत: घन:श्यामने सांगितले आहे. त्याने सोशल मीडियावर थेट एक व्हिडीओ शेअर केला आहे.

शेअर केला व्हिडीओ

घन:श्यामने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो बोलताना दिसत आहे की, ‘नमस्कार मित्रांनो, सर्वांचे खूप धन्यवाद. व्हिडीओ बनवण्याचे कारण एकच आहे की, आजपर्यंत कमेंट सेक्शन पाहात आलो. कोणी मला ट्रोल केले. वाईट साईट बोललं. कोणी पॉझिटिव्ह बोलायचे. पण आज कळालं की माणूस गेल्याच्या नंतर माणसं त्याच्या मागे किती चांगलं बोलतात. भलेही तो माणूस जिवंत असो वा नसो. मला एकच सांगयचं आहे की तुमची कायम साथ आहे म्हणून हा घन:श्याम दरोडे खंभीरपणे लढला आहे आणि पुढेही लढत राहिल.’

वाचा: या भाजीपुढे कोंबडी सुद्धा फिक्की… मटन तर काहीच नाही; एकदा खाल तर… मिळते फक्त पावसाळ्यातच

“मी ठिक आहे”

पुढे तो म्हणाला, ‘कोणत्या तरी एका दादाने त्याच्या अकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. बिग बॉस फेम घन:श्याम यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. तुम्हाला सर्वांना एक विनंती करतो. तुमच्या घन:श्यामला काहीच झालेले नाही आणि सगळ्यात महत्त्वाचे एखाद्या व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहिली तर त्याचे आयुष्य वाढते. पण मला त्या दादाला एकच सांगायचे आहे की माझ्या बाबतीत केलं इतर कुणाच्या बाबतीत करु नको. तुम्हाला सर्वांना देखील विनंती करतो काळजी करु नका, मला फोन करु नका, प्रेमाने करताय पण काळजी करुन फोन करु नका, टेन्शन घेऊ नका, मला काहीही झालेले नाही. मी धडधाकट आहे. मी बोलतोय चालतोय एकदम व्यवस्थित आहे. माझा दोन महिन्यांपूर्वी अपघात झाला होता. आता मी ठिक आहे. काळजी करु नका. ती अफवा खोटी आहे. ती पोस्ट खरी नाही.’

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हिडीओच्या शेवटी घन:श्यामच्या फोटोला हार घातलेले एक पोस्टर शेअर करण्यात आले आहे. या पोस्टरवर ‘पुढाऱ्यांना श्रद्धांडली वाहणाऱ्याला पुढाऱ्यांनी शोधून काढत वाहिली आदरांजली’ असे लिहिण्यात आले आहे. तसेच व्हिडीओ शेअर करत त्याने, ‘मला श्रद्धांजली वाहणाऱ्याला शोधुन काढले’ असे कॅप्शन दिले आहे. सध्या सोशल मीडियावर घन:श्यामचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.

पोलिसात तक्रार

घन:श्याम दरोडेने याबाबात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली आहे. दोन सोशल मीडिया चॅनेलवरून त्यांच्या विरोधात जाणीवपूर्वक बदनामी करणारे व्हिडिओ प्रसारित केल्याचा आरोप त्याने तक्रारीमध्ये केला आहे.

नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी
नाशकात भूंकप, युतीनंतर ठाकरे बंधूंना धक्का; मनसे-ठाकरे नेते भाजपवासी.
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक
देवयानी फरांदे भावूक; भाजप प्रवेश अन निष्ठावंतांच्या न्यायासाठी उद्रेक.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित.
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?.
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया.
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात...
कोणतीही तडजोड नाही, वंचितकडून काँग्रेसला मोठा प्रस्ताव अन् राज्यात....
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?
जगताप यांच्या काँग्रेस प्रवेशावरून पुणे शहर काँग्रेसमध्ये नाराजी?.
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार
भाजपचा एकाचवेळी काँग्रेस, ठाकरे सेनेला जोर का धक्का! BJPची ताकद वाढणार.
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा
..तो भी पिटोगे, मराठी भाषेच्या अपमानावरून संदीप देशपांडेंचा थेट इशारा.