व्हिलन ठरलेली जान्हवी सासरी मात्र ‘संस्कारी सून’; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले ‘डोळ्यात पाणी आलं’
बिग बॉस मराठी 5 मध्ये वादग्रस्त ठरलेल्या जान्हवी किल्लेकरने लक्ष्मीपूजनाचा एक भावनिक व्हिडीओ शेअर केला आहे.या व्हिडीओमुळे नेटकऱ्यांनी तिचे भरभरून कौतुक केले आहे. जान्हवीच्या या वागण्याने तिची प्रतिमा पूर्णपणे बदलली आहे.

‘बिग बॉस मराठी 5’ मधले सर्वच स्पर्धकांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यातल्या काही स्पर्धकांना सुरुवातीला ट्रोलही केलं गेलं ज्यापैकी एक होती जान्हवी किल्लेकर. जानव्हीने सुरुवातीला रागाच्या भरात अनेकांची मने दुखावली त्यामुळे तिला प्रेक्षकांडून नकारात्मक प्रतिसाद येत होता. रितेश देशमुख यांनी वारंवार तिला तिच्या चुका लक्षात आणून दिल्यानंतर जान्हवीने तिच्या वागण्यात सुधारणा केली. त्यानंतर मात्र तिच्यात झालेला हा बदल प्रेक्षकांनीही अनुभवला आणि तिच्या बद्दलचे नकारात्मक मत बदलू लागले.
- Janhvi Killekar Lakshmi Puja video
सासूबाई आणि जाऊबाईंचे दूधाने पाय धुतले
‘बिग बॉस’च्या घराबाहेर आल्यानंतर जान्हवी तिच्या सोशल मीडियावर काहीना काही चाहत्यांसोबत शेअर करत असते. तिने आता लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी तिचे तोंडभरून कौतुक केलं आहे. जान्हवीने लक्ष्मीपूजनाच्या दिवशीचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यात जान्हवीच्या सासूबाई सोफ्यावर बसलेल्या दिसत आहेत. जान्हवी आणि तिचा नवरा सासूबाईंचे दुधाने पाय धूत असून त्यांची पूजा करताना दिसत आहेत. शेवटी जान्हवीने सासूबाईंच्या पायांवर डोकं टेकवून पायाही पडली.
View this post on Instagram
जान्हवीने फक्त सासूबाईच नाही तर तिच्या जाऊबाई आणि घरातल्या लहान मुलींचे पाय धुवून त्यांचीही पूजा केली. आणि त्या सर्वांच्याही पायावर डोके ठेऊन पाया पडली. जान्हवीच्या या व्हिडीओचं सध्या सगळीकडे कौतुक होतंय.
जान्हवीच्या वागण्याचे नेटकऱ्यांकडून कौतुक
जान्हवीच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी पसंती दर्शवत तिचं भरभरून कौतुक केलं आहे. एका यूजरने लिहिले आहे की, “खरंच जानवी खूप छान, खर तर तूच लक्ष्मी आहे”, तर एकाने लिहिले आहे “बिग बॉस मध्ये तू जशी होती तशी रियल मध्ये नाही. खूप छान वाटलं तुझ्या आईची शिकवण धन्य आहे” , तसेच एकाने कौतुक करत म्हटलं “जान्हवी ताई तुमचा हा व्हिडिओ बघून डोळ्यात अश्रू आले” अशा कमेंटसचा वर्षावर करत चाहत्यांनी जान्हवीचे तोंडभरून कौतुक केलं आहे.
