पूजा भट्ट की एल्विश यादव, कोण जिंकणार ‘Bigg Boss OTT 2’ची ट्रॉफी? माजी स्पर्धकांनी सांगितलं नाव

आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी चाहतेसुद्धा जोरदार वोटिंग करत आहेत. या सिझनचा विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावरही विविध अंदाज वर्तवले जात आहेत. अशातच बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकांनी विजेताबाबत अंदाज वर्तवले आहेत.

पूजा भट्ट की एल्विश यादव, कोण जिंकणार Bigg Boss OTT 2ची ट्रॉफी? माजी स्पर्धकांनी सांगितलं नाव
Pooja Bhatt and Elvish Yadav
Image Credit source: Instagram
| Updated on: Aug 14, 2023 | 9:18 AM

मुंबई | 14 ऑगस्ट 2023 : ‘बिग बॉस ओटीटी 2’च्या ग्रँड फिलानेसाठी अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. पूजा भट्ट, बेबिका धुर्वे, एल्विश यादव, मनीषा राणी आणि अभिषेक मल्हान या पाच जणांपैकी कोणीतरी एक स्पर्धक बिग बॉसची ट्रॉफी आपल्या नावे करणार आहे. आपल्या आवडत्या स्पर्धकासाठी चाहतेसुद्धा जोरदार वोटिंग करत आहेत. या सिझनचा विजेता कोण ठरणार याविषयी सोशल मीडियावरही विविध अंदाज वर्तवले जात आहेत. अशातच बिग बॉसच्या एका माजी स्पर्धकांनी विजेताबाबत अंदाज वर्तवले आहेत. अंतिम फेरीपर्यंत पोहोचून ज्यांचा प्रवास संपला, अशा स्पर्धकांनी विजेत्याच्या नावाबद्दल हा अंदाज वर्तवला आहे.

अविनाश सचदेवच्या मते अभिनेत्री पूजा भट्ट या सिझनची विजेती ठरू शकते. पूजाने हा सिझन जिंकावा अशी त्याची इच्छा आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री पहायला मिळाली. घरातील अनेक टास्कदरम्यान दोघांनी एकमेकांची साथ दिली होती. म्हणूनच अविनाशने पूजा भट्टचं नाव विजेतीसाठी सुचवलं आहे. तर ग्रँड फिनालेच्या आठवड्यातच घराबाहेर पडलेली स्पर्धक जिया शंकरने दोन स्पर्धकांची नावं घेतली आहेत. अभिषेक मल्हान किंवा एल्विश यादव या दोघांपैकीच एकाने हा सिझन जिंकावा, अशी इच्छा जियाने व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियावरही याच दोघांच्या नावांची चर्चा आहे.

शोदरम्यान एल्विश यादव आणि जिया शंकर यांच्यात बरेच वाद झाले होते. मात्र शेवटच्या आठवड्यात त्यांच्यात चांगली मैत्री झाली. दोघांनी एकमेकांसोबत चांगला वेळ घालवला होता. तर अभिषेक मल्हान आणि जिया हे सिझनच्या सुरुवातीपासूनच एकमेकांच्या बाजूने होते. या दोघांमधील केमिस्ट्रीला पाहून चाहत्यांनीही त्यांना ‘अभिया’ असं नाव दिलं होतं.

बिग बॉसच्या घरातून सुरुवातीच्या आठवड्यांमध्ये बाद झालेली स्पर्धक आकांक्षा पुरी हिनेसुद्धा अभिषेक मल्हानचं नाव विजेत्यासाठी सुचवलं आहे. “अभिषेकने संपूर्ण सिझनमध्ये दमदार कामगिरी केली आहे. सुरुवातीपासून आमच्यात चांगली मैत्री होती. मात्र नंतरच्या खेळीदरम्यान त्यात फूट पाडली गेली. माझ्याबद्दल काही अशा गोष्टी बोलल्या गेल्या, ज्यामुळे काही जणांपासून माझ्यात दुरावा निर्माण झाला. पण अभिषेकने या सिझनची ट्रॉफी जिंकावी अशीच माझी इच्छा आहे”, असं ती म्हणाली.