Elvish Yadav | एल्विश यादव याचा धमाका सुरूच, दुबईतील घरानंतर थेट खरेदी केली इतक्या कोटींची आलिशान कार
एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. एल्विश यादव हा बिग बाॅस ओटीटी 2 चा विजेता आहे. एल्विश यादव याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही देखील बघायला मिळते. एल्विश यादव सोशल मीडियावर सक्रिय असतो.

मुंबई : एल्विश यादव हा गेल्या काही दिवसांपासून तूफान चर्चेत आहे. एल्विश यादव (Elvish Yadav) याची मोठी फॅन फाॅलोइंग ही सोशल मीडियावर बघायला मिळते. एल्विश यादव हा बिग बाॅसच्या घरात अत्यंत कमी दिवस राहून थेट विजेता झाला. बिग बाॅस ओटीटी 2 (Bigg Boss Ott 2) चा विजेता झाल्यानंतर एल्विश यादव हा चांगलाच चर्चेत आलाय. एल्विश यादव अनेक शोमध्ये सहभागी होताना देखील दिसतोय. काही दिवसांपूर्वीच एल्विश यादव याने त्याच्या भारतातील घराची एक झलक आपल्या चाहत्यांना दाखवली.
एल्विश यादव हा कोट्यवधी संपत्तीचा आज मालक आहे. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वीच एल्विश यादव याने दुबईमध्ये एक अत्यंत आलिशान असे घर खरेदी केले. या घराची झलक आपल्या चाहत्यांना दाखवताना एल्विश यादव हा दिसला. एल्विश यादव याने बिग बाॅस ओटीटी जिंकल्यानंतर या घराची खरेदी केली. विशेष म्हणजे या घरासाठी एल्विश यादव याने मोठी रक्कम मोजलीये.
आता एल्विश यादव याने दुबईला घर खरेदी केल्यानंतर थेट एक अत्यंत लग्झरी अशी गाडी खरेदी केलीये. एल्विश यादव याने खरेदी केलेल्या या गाडीची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे. विशेष म्हणजे या गाडीमध्ये फिरताना एल्विश यादव हा दिसला. गाडी घेतल्याच्या आनंदात आपल्या मित्रांसोबत धमाल करताना देखील एल्विश यादव हा त्याच्या ब्लाॅगमध्ये दिसतोय.
एल्विश यादव याने मर्सिडीज बेंज E53 AMG कॅब्रियोलेट ही कार खरेदी केलीये. एल्विश यादव याने खरेदी केलेल्या कारची किंमत 1.30 कोटी आहे. पावरफुल 2999 cc इंजन या कारला आहे. ही कार अत्यंत लग्झरी आहे. बिग बाॅस ओटीटी 2 जिंकल्यानंतर सतत एल्विश यादव हा मोठी खरेदी करताना दिसतोय. अगोदर दुबईमध्ये घर आणि आता थेट ही कार.
एल्विश यादव हा काही दिवसांपूर्वीच शहनाज गिल हिच्या शोमध्ये पोहचला. यावेळी एल्विश यादव हा काही धक्कादायक खुलासे करताना दिसला. एल्विश यादव याने थेट सांगितले की, मला अजूनही बिग बाॅस ओटीटी 2 च्या निर्मात्यांनी 25 लाख रूपये दिले नाहीत. एल्विश यादव याचे हे बोलणे ऐकून अनेकजण हैराण झाल्याचे बघायला मिळाले.
एल्विश यादव याला शहनाज गिल हिने म्हटले की, तू चाैथा फोन कधी खरेदी करणार आहेस? यावर एल्विश यादव हा थेट म्हणाला की, ज्यावेळी बिग बाॅसचे निर्माते हे माझे 25 लाख रूपये देतील त्यावेळी. यानंतर शहनाज गिल ही देखील हैराण झाल्याचे बघायला मिळाले. शहनाज गिल ही थेट म्हणाली की, हे चुकीचे आहे.