Bigg Boss OTT 3 शोच्या एका एपिसोडमध्ये अनिल कपूर होणार मालामाल, कोट्यवधींमध्ये करणार कमाई

Bigg Boss OTT 3 | बिग बॉस ओटीटीच्या एका एपिसोडसाठी अनिल कपूर यांना किती मिळणार मानधन, एका एपिसोडमध्ये अनिल कपूर होणार मालामाल, एका आठवड्यात कमावणार इतके कोटी? सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अनिल कपूर यांची चर्चा...

Bigg  Boss OTT 3 शोच्या एका एपिसोडमध्ये अनिल कपूर होणार मालामाल, कोट्यवधींमध्ये करणार कमाई
| Updated on: Jun 09, 2024 | 12:23 PM

अभिनेते अनिल कपूर यांना आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. वयाच्या 67 व्या वर्षी देखील अनिल कपूर चाहत्यांना फिटनेस टिप्स देत असतात. आता अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोच्या माध्यमातून चाहत्यांचं मनोरंजन करताना दिसणार आहेत. ‘बिग बॉस ओटीटी 3’ शोमध्ये होस्टची भूमिका साकारताना दिसणार आहेत. ज्यासाठी अनिल कपूर यांना तगडं मानधन देखील देण्यात येणार आहे. रकमेचा आकडा देखील समोर आला आहे. सध्या सर्वत्र फक्त अनिल कपूर आणि त्यांना मिळणार असलेल्या मानधनाची चर्चा रंगली आहे.

‘बिग बॉस ओटीटी 3’ शोची सुरूवात 21 जून 2024 मध्ये होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कपूर यांना एका एपिसोडसाठी 2 कोटी मानधन मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. म्हणजे प्रत्येक आठवड्यात अनिल कपूर यांची 4 कोटी रुपयांची कमाई होणार आहे.

 

 

सांगायचं झालं तर, अभिनेता सलमान खान याच्या तुलनेत अनिल कपूर यांना मिळणारं मानधन फार कमी आहे. बॉलिवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक याने देखील बिग बॉसच्या होस्टची भूमिका साकारली आहे. शोच्या एका एपिसोडसाठी करण याला 2-2.5 कोटी रुपये मानधन मिळायचं…

रिपोर्टनुसार, 2010 पासून सलमान खान ‘बिग बॉस’ शोच्या होस्टची भूमिका पार पाडत आहे. सलमान खान याच्यामुळेच शो यशाच्या शिखरावर पोहोचला असं म्हणायला हरकत नाही. सुरुवातील शोच्या एका एपिसोडसाठी सलमान 2-2.5 कोटी मानधन घ्यायचा. त्यानंतर अभिनेत्याच्या मानधनात हळू-हळू वाढ होऊ लागली. ‘बिग बॉस 17’ साठी अभिनेत्याल जवळपास 350 कोटी मानधन मिळालं होतं. ‘बिग बॉस ओटीटी 2’ च्या एका एपिसोडसाठी सलमान खान 12.5 कोटी मानधन घेत होता.

अनिल कपूर यांनी व्यक्त केला आनंद

‘बिग बॉस ओटीटी 3’ शोच्या होस्टसाठी आपल्या नावाची घोषणा केल्यानंतर अनिल कपूर यांनी आनंद व्यक्त केला होता. ‘बिग बॉस ओटीट आणि मी एक स्वप्न आहे…. आम्ही दोघे तरूण आहोत… लोकं मला कायम म्हणतात मी रिव्हर्स एजिंग आहे. पण बिग बॉस खरंच तसं आहे… असं वाटत आहे की, मी पुन्हा शाळेत जात आहे…’ असं अनिल कपूर म्हणाले होते.

 

 

अनिल कपूर यांच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. ‘मिस्टर इंडिया’, ‘तेजाब’, ‘बीटा’, ‘अंदाज’, ‘जुदाई’, ‘एनिमल’ यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्यानंतर अनिल कपूर ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये दिसणार आहेत. आता चाहत्यांची प्रतिक्षा देखील शिगेला पोहोचली आहे.