Bigg Boss : भाऊ-बहिणीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री, रोमान्स पाहून गर्लफ्रेंड भावूक, 5 वर्षांचं नातं क्षणात धुळीस मिळवलं!

'बिग बॉस'मध्ये स्काउट ओपी आणि अभिनेत्री लव्ह गिल यांच्यातील वाढती जवळीक पाहून, स्काउटची गर्लफ्रेंड काशवी बरीच भावूक झाली आहे. एका लाइव्ह स्ट्रीमदरम्यान काशवी हिने केलेल्या विधानांमुळे आता त्यांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Bigg Boss : भाऊ-बहिणीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री, रोमान्स पाहून गर्लफ्रेंड भावूक, 5 वर्षांचं नातं क्षणात धुळीस मिळवलं!
| Updated on: Nov 07, 2026 | 3:11 PM

Bigg Boss : अभिनेता सलमान खान याचा वादग्रस्त ‘बिग बॉस’ शो आता रंगात आला आहे. स्पर्धकांचे वाद आणि चव्हाट्यावर येत आहेत, ज्यामुळे काहीच्या खासगी आयुष्यात देखील मोठं वादळ आलं आहे. ‘बिग बॉस 20’ मध्ये पंजाबी अभिनेत्री लव्ह गील आणि गेमर स्काउट यांच्या ऑनस्क्रिन केमिस्ट्रीमुळे सर्वत्र खळबळ माजली आहे. दोघांच्या नात्यावर देखील अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. एवढंच नाही तर सलमान खान आणि रोहित शेट्टी यांनी देखील दोघांना चांगलंच सुनावलं आहे. लव्ह गिल हिच्यासोबत असलेल्या नात्यामुळे आता स्काउट याची गर्लफ्रेंड काशवी हिने ब्रेकअप करत 5 वर्षांचं नातं संपवण्याचा निर्णय घेतला आहे.

काशवी हिच्यासोबत असलेलं नात मोडणार?

Loading...

सांगायचं झालं तर, अभिनेत्री लव गिलसोबत कॅमेऱ्यात वाढती जवळीक पाहता स्काउट ओपीची गर्लफ्रेंड काशवी हीरानंदानी हिने शोमध्ये येऊन स्काउटला स्पष्ट शब्दांत सांगितलं होतं की, त्याने लव्हपासून लांब राहावं. परंतु गर्लफ्रेंडने बजावल्यानंतर देखील स्काउट दोन दिवसांनंतरच लव्ह गिलसोबत पुन्हा शोमध्ये हसत-खेळत दिसून आला.

 

 

एवढंच नाही तर, नुकताच झालेल्या एका एपिसोडमध्ये स्काऊटने हे स्वीकारलं की त्याला लव्ह गिलसोबतच आनंद मिळतो आणि तो बाहेर गेल्यानंतरही तिची साथ सोडणार नाही. सोबतच लव आणि स्काउट आधीप्रमाणे एकमेकांसोबत शारीरिकदृष्ट्या जवळ येऊन मस्ती करताना दिसले, ज्यानंतर स्काउटला सोशल मीडियावर जोरदार ट्रोलही केलं जात आहे.

स्काउट आणि काशवी यांचं होणार ब्रेकअप?

काशवीने नात्यावर म्हटलं- “5 वर्षेच तर झाली होती, इतरांनी तर…” तिने हसतहसत स्काउटच्या चाहत्यांना सांगितले- “तुम्ही लोक शोला शोच्या दृष्टीने पहा, एन्जॉय करा, मनोरंजनाचा आनंद घ्या.” काश्वीने चाहत्यांना विनंती केली आहे की, त्यांनी प्रेम आणि स्काउटबद्दल होणाऱ्या चर्चांकडे जास्त लक्ष देऊ नये, कारण त्यांच्या कमेंट्समुळे या गोष्टींना आणखीनच हवा मिळते., सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त काशवी – स्काउट यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा रंगल्या आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us