Bigg Boss 16 | ‘या’ स्पर्धकावर बिग बॉसची खास कृपा? सर्वांत कमजोर असूनही दिलं तिकिट-टू-फिनाले

या सिझनमधली ती सर्वांत कमजोर स्पर्धक असूनही सर्वांत आधी तिला तिकिट-टू-फिनाले मिळाल्याने नेटकऱ्यांचा राग अनावर झाला. यामुळे शोच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला.

Bigg Boss 16 | 'या' स्पर्धकावर बिग बॉसची खास कृपा? सर्वांत कमजोर असूनही दिलं तिकिट-टू-फिनाले
Bigg Boss 16 Image Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Jan 31, 2023 | 3:52 PM

मुंबई: बिग बॉसमध्ये पक्षपात होतो, याची चर्चा प्रत्येक सिझनमध्ये होते. यंदाच्या सोळाव्या सिझनमध्येही असंच काहीसं पहायला मिळतंय. बिग बॉसकडून सतत एका स्पर्धकाची पाठराखण केली जातेय. या सिझनमधली ती सर्वांत कमजोर स्पर्धक असूनही सर्वांत आधी तिला तिकिट-टू-फिनाले मिळाल्याने नेटकऱ्यांचा राग अनावर झाला. यामुळे शोच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहित पक्षपातीपणा केल्याचा आरोप केला. बिग बॉस 16 सध्या अंतिम टप्प्यात पोहोचलं आहे. यावेळी घरात जितके स्पर्धक राहिले आहेत, त्यापैकी सर्वांत कमकुवत निम्रत कौर आहलुवालिया आहे आणि तिलाच तिकिट-टू-फिनाले मिळालं आहे.

वोटिंग ट्रेंडमध्ये सुम्बुल तौकिर खान ही निम्रतपेक्षाही पुढे निघून गेली आहे. अशात जर निम्रत नॉमिनेशनमध्ये अडकली तर कमी मतं आणि कमजोर खेळी यांच्या आधारे तिलाच घराबाहेर जावं लागलं असतं. मात्र बिग बॉसने निम्रतला वाचवलं. निम्रतला शोमध्ये ठेवण्यासाठी बिग बॉसने तिला काहीच न करता घराचं कॅप्टन बनवलं आणि थेट ग्रँड फिनालेचं तिकिट दिलं.

हे सुद्धा वाचा

नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये बिग बॉसने तिकिट-टू-फिनालेसाठी जो टास्क दिला होता, तो पूर्णपणे निम्रतच्या बाजूने डिझाइन केल्याचाही आरोप होतोय. निम्रतकडून कॅप्टनचा टॅग हिसकावून घेण्याचा हक्कसुद्धा बिग बॉसने एमसी स्टॅनला दिला होता. एमसी स्टॅन हा निम्रतकडून कॅप्टन्सी हिसकावून घेणार नाही हे सर्वांनाच माहीत होतं.

जर निम्रतची कॅसेट प्रियांका किंवा अर्चनाला दिली असती तर टास्क नि:पक्षपातीपणे पार पडल्याचं म्हटलं गेलं असतं. मात्र बिग बॉसने असं केलं नाही. कारण प्रियांका आणि अर्चनाला निम्रतची कॅसेट देणं म्हणजे तिला फिनालेच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासारखं झालं असतं. अशात बिग बॉसने पक्षपातीपणा करत निम्रतला फिनालेमध्ये पोहोचवलं.

टास्क पाहिल्यानंतर अर्चना गौतमनेही हाच आरोप केला होता की त्याची डिझाइन निम्रतच्या बाजूने करण्यात आली आहे. त्यावरून बिग बॉसने अर्चनाची शाळा घेतली होती. बिग बॉसने अर्चनाला म्हटलं की त्याच्या हेतूवर शंका घेऊ नये. मात्र बिग बॉसचा हा पक्षपातीपणा केवळ स्पर्धकांनाच नाही तर प्रेक्षकांनाही समजून चुकला आहे. म्हणूनच सोशल मीडियावर बिग बॉसवर टीका होत आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.