अभिषेक – ऐश्वर्या खरंच होणार होते विभक्त? अभिनेत्याने अखेर मौन सोडलंच

Aishwarya Rai - Abhishek Bachchan : मर्यादे पलीकडे जात असल्याचं कळल्यानंतर..., ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चन याने अखेर सोडलं मौन... सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या वक्तव्याची चर्चा...

अभिषेक - ऐश्वर्या खरंच होणार होते विभक्त? अभिनेत्याने अखेर मौन सोडलंच
Actress Aishwarya Bachchan
| Updated on: Dec 11, 2025 | 1:15 PM

Aishwarya Rai – Abhishek Bachchan : गेल्या वर्षभरापासून अभिनेत्री ऐश्वर्या राय आणि अभिनेता अभिषेक बच्चन यांच्या नात्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. दोघांच्या नात्यात दुरावा आला आहे आणि याच कारणामुळे दोघांनी विभक्त होण्याचा म्हणजे घटस्फोट घेण्याचा निर्मण घेतल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं… सांगायचं झालं तर, काही महिन्यांपूर्वी अभिषेक बच्चन याने इन्स्टाग्रामवर घटस्फोटासंबंधी एक पोस्ट लाईक केली होती. ज्यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं… अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये काही बिनसलं आहे.. अशा चर्चांनी जोर धरला…

घस्फोटाच्या चर्चा रंगल्यानंतर कोणात्याही कार्यक्रमात ऐश्वर्या लेक आराध्या बच्चन हिच्यासोबत दिसायची आणि पूर्ण बच्चन कुटुंब एकत्र दिसायचं… त्यामुळे घटस्फोटाच्या चर्चांनी आगीत तेल ओतण्याचं काम केलं… असंही म्हटलं जात होतं की, ऐश्वर्या बच्चन तिच्या आईसोबत कुटुंबापासून वेगळी राहते. पण, घटस्फोटाच्या सततच्या अफवांवर तिचा पती आणि बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने आता आपले मौन सोडले आहे.

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिषेक बच्चन याने खासगी आयुष्यावर मोठं वक्तव्य केलं आहे. ‘घटस्फोटाच्या चर्चा सुरु आहेत. याबद्दल मला काहीही माहिती नव्हतं. मला त्याबद्दल बोलण्याची गरज नाही कारण मला माहित नाही की, आमच्याबद्दल लोकांमध्ये काय चर्चा सुरु आहेत…’

‘जर तुम्ही सेलिब्रिटी आहात, तर लोक तुमच्याबद्दल अनेक चर्चा करतील… काहीही लिहिलं जाईल… जे पूर्णपणे चुकीचं असेल… ज्यामध्ये काहीही तथ्य नसले… आमचं लग्न झालं नव्हतं तेव्हा देखील अशा असंख्य चर्चा रंगल्या. लग्न कधी होणार आणि झाल्यानंतर घटस्फोट कधी होणार या चर्चांनी जोर धरला… ‘

संताप व्यक्त करत अभिषेक म्हणाला, ‘ऐश्वर्या हिला माझं सत्य माहिती आहे आणि मला तिचं… आम्ही आमच्या कुटुंबात आनंदी आहोत… जे आमच्यासाठी सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला माझ्या कुटुंबियांबद्दल काही बोलायचं असेल तर, आधी माझा सामना करावा लागेल… कारण तुम्ही आता मर्यादे पलीकडे जात आहात… त्यामुळे माझ्या कुटुंबाबद्दल कोणतंही वाईट वक्तव्य मी खपवून घेणाक नाही..’ असं देखील अभिषेक म्हणाला.

ऐश्वर्या आणि अभिषेक यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्यण घेतला. 2007  मध्ये ऐश्वर्या आणि अभिषेक यांचं लग्न झालं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने लेक आराध्या हिला जन्म दिला…