दारुमुळे लोकप्रिय अभिनेत्याचं आयुष्य उद्ध्वस्त, नशेत मुलींना अश्लील कॉल आणि…; म्हणाला, ‘माझं नियंत्रण…’
दारुने उद्ध्वस्त केलं प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं आयुष्य... ज्याचा वाईट परिणाम झाला अभिनेत्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यावर... एका मुलाखतीत स्वतःच म्हणाला, 'महिलांना अश्लील कॉल करायचो आणि नियंत्रण नसायचं...', सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याची चर्चा...

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते आणि लेखक पियुष मिश्रा यांनी दारुच्या वाईट सवयीबद्दल मोठा खुलासा केला आहे. ज्याचा परिणाम पियुष यांच्या प्रोफेशनल आयुष्यावरच नाही तर, खासगी आयुष्यावर देखील झाला. अशात नुकताच झालेल्या एका मुलाखतीत पियुष यांनी सांगितलं की, एकदा नशेत असताना आईला प्रचंड वाईट बोललो… एवढंच नाही तर, अनेक महिला आणि मुलींना नको ते अश्लील कॉल मी केलेले आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नक्की काय झालं… हे अभिनेत्याला लक्षात देखील नसायचं… नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत पियुष मिश्रा यांनी स्वतःच्या आयुष्याबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त पियुष मिश्रा यांच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे.
मुलाखतीत पियुष मिश्रा म्हणाले, ‘दारु प्यायल्यानंतर मी अनेक अशी कामं केली आहेत, त्यानंतर मला कळलं की मी तर असा नाहीये… आई खूप काही वाईट बोललो… त्यावेळी मी मुंबईत होतो आणि माझी आई माझ्यासोबत होती… मला कळलं होतं की, आपल्याला कळू लागलं आहे आणि माफ केलं पाहिजे… पण तरी देखील मी थांबलो नाही…’
नशेत मुलींना अश्लील फोन…
पियुष मिश्रा पुढे म्हणाले, ‘मुलींना तर खूप वाईट आणि अश्लील फोन केले आह आणि सकाळी मला आठवत देखील नसायचं की, मी कोणाला फोन केलेला आणि काय म्हणालेलो. नंतर त्या मुलीने मला सांगितलं, सर तुम्ही फोन केलेला आणि असं सर्वकाही बोललात… तेव्हा मी नकार दिला. म्हणालो मी तर फोन केलाच नाही…. तेव्हा माझी परिस्थिती अशी होती की, नशेत मला काहीही कळत नव्हतं. माझं माझ्यावर नियंत्रण नव्हतं… ‘
पियुष मिश्रा पुढे म्हणाले, ‘माझ्या दारुच्या सवयीमुळे लोक मला घाबरु लागले होते आणि माझ्यासोबत बोलण्यासाठी देखील पुढे येत नव्हते… माझ्या सवयीचा माझ्या कामावर वाईट परिणाम होत होता… अनेकांनी तर माझ्यासोबत काम करण्यासाठी देखील नकार दिला… आणि ही गोष्ट माझ्यासाठी फार मोठी धक्का देणारी होती. मी त्यांना सतत सांगायचो, मी आता पूर्वीसारखा राहिलेलो नाही, मी स्वतःला संभाळलं आहे.’ असं देखील पियुष मिश्रा म्हणालेले…
पियुष मिश्रा यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांनी ‘मकबूल’ (2003), ‘रॉकस्टार’ (2011), ‘तमाशा’ (2015), ‘हैप्पी भाग जाएगी’ (2016), ‘पिंक’ (2016) आणि ‘संजू’ (2018) सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. एवढंच नाही तर, त्यांनी ‘गँग्स ऑफ वासेपूर’ या सीरिजसाठी कंपोजर, गायक आणि अभिनेता म्हणून देखील केलं आहे. त्यांच्या कामाची यादी फार मोठी आहे…