
मुंबई : अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) कायम त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतो. अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्याने चाहत्यांचं मनोरंजन केलं आणि प्रसिद्धीझोतात आला. पण आता अभिनेता गर्लफ्रेंड गॅब्रिएला (gabriella demetriades) हिच्यामुळे चर्चेत आला आहे. अभिनेत्याची गर्लफ्रेंड गॅब्रिएला दुसऱ्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगत आहे. खुद्द गॅब्रिएला हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटोमध्ये अभिनेत्री बेबी बम्प दाखवताना दिसत आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांनी कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या सर्वत्र अभिनेता आणि गर्लफ्रेंड गॅब्रिएला यांची चर्चा रंगत आहे.
अभिनेता अर्जुन रामपाल याची गर्लफ्रेंड आणि साउथ अफ्रीकन मॉडेल गॅब्रिएला हिने इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये प्रेग्नेंट असल्याचं दिसून येत आहे. अर्जुन रामपाल गेल्या अनेक वर्षांपासून गर्लफ्रेंडसोबत लिव्हइन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. पण दोघांनी अद्याप लग्न केलेलं नाही. दोघांना एक मुलगा देखील आहे. त्यांच्या मुलाचं नाव एरिक असं आहे.
गॅब्रिएलाने काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत, ज्याद्वारे तिने तिच्या दुसऱ्या गरोदरपणाची गोड बातमी चाहते आणि सेलिब्रिटींसोबत शेअर केली आहे. इंस्टाग्राम हँडलवर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये ‘वास्तविकता की कृत्रिम बुद्धिमत्ता?’ असं लिहिलं आहे. प्रग्नेंसी दरम्यानचे फोटो पोस्ट केल्यामुळे गॅब्रिएला तुफान चर्चेत आहे. फोटो व्हायरल होताच अनेकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
काजल अग्रवालपासून दिव्या दत्तापर्यंत सर्वांनी गॅब्रिएला दुसऱ्यादा आई होणार असल्यांमुळे अभिनंदन केलं आहे. गॅब्रिएला आणि अर्जुन रामपाल यांची भेट आयपीएल पार्टीदरम्यान झाली होती. यानंतर, दोघांच्या मैत्रीचे हळूहळू भेटीत रुपांतर झाले आणि 2019 मध्ये दोघांनी एका मुलाला जन्म दिला. मात्र, अर्जुन आणि गॅब्रिएला यांनी लग्न केलं नाही. दोघांत्या नात्याला चार वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे.
रिपोर्ट्सनुसार, गॅब्रिएला डेमेट्रिएड्स अर्जुन कपूरसोबत एका सिनेमात दिसणार आहे. सिनेमाचं शिर्षक अद्याप ठरवण्यात आलेलं नाही. सिनेमात गॅब्रिएला ब्रिटिश-भारतीय पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात दोघांचा रोमाँटिक अंदाज देखील प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.