Vastu Shastra : जर घरात विनाकारण भांडणं होत असतील तर काय करावं? वास्तुशास्त्रात सांगितलाय सोपा उपाय
वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये तुमच्या घरात निर्माण होणाऱ्या विविध समस्यांवर उपाय सांगण्यात आले आहेत, अनेकदा असं होत की काहीही कारण नसताना घरात वाद होतो, जर असे वाद आणि भांडणं दररोजच होत असतील तर काय करावं? यावर वास्तुशास्त्रामध्ये काही सोपे उपाय सांगण्यात आले आहेत.

वास्तुशास्त्र हे हे एक असं शास्त्र आहे, जे तुमचं घर कसं असावं? याबद्दल मार्गदर्शन करतं, जसं की तुमच्या घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा? स्वयंपाक घराची दिशा कोणती असावी? बेडरूमसाठी योग्य दिशा कोणती? देवघर कसं असावं? अशा अनेक प्रश्नांची उत्तर ही वास्तुशास्त्रामध्ये देण्यात आली आहेत. मात्र याचबरोबर अनेकदा आपल्या घरात अचानक संकटं येऊ लागतात. जसं की पैसा हातात टिकत नाही, काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांसोबत वाद होतात. पती-पत्नीमध्ये पटत नाही. तर यावर देखील वास्तुशास्त्रामध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात वास्तुदोष निर्माण होतो, तेव्हा अशा समस्या निर्माण होतात. परंतु वास्तुशास्त्रामधील काही उपायांच्या मदतीनं तुम्ही घरातील वस्तूदोष दूर करू शकतात. आज आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
घर स्वच्छ ठेवा – वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात नियमित साफसफाई केली जाते, जे घर स्वच्छ असतं अशा घरावर नेहमी लक्ष्मी मातेचा आशीर्वाद असतो. तसेच अशा घरामध्ये सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, त्यामुळे अशा घरामध्ये कधीही पैशांची कमी भासत नाही, तसेच घरात सुख-शांती राहते, घरात वाद होत नाहीत.
नियमित दिवा लावावा – वास्तुशास्त्रानुसार सायंकाळच्या वेळी नेहमी देवघरात आणि तुळशी जवळ दिवा लावावा, तुळस ही भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांचं प्रिय झाडं आहे. ज्या घरात तुळस असते, त्या घरावर सदैव भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा राहते. त्यामुळे अशा घरावर कधीही संकट ओढावत नाही. घरात नेहमी आनंदाचं वातावरण राहतं, आणि प्रगती होते.
दरवाजा उघडताना काळजी घ्या – तुम्ही जेव्हा कधीही तुमच्या घराचा मुख्य दरवाजा उघडता तेव्हा एक काळजी घ्यावी, त्या दरवाजाचा किंवा कडीचा जास्त आवाज होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.
बेडरूममध्ये राधा कृष्ण यांचा फोटो असावा – तुमच्या बेडरूममध्ये राधा कृष्ण यांचा एक फोटो लावावा, वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये राधा कृष्ण यांचा फोटो लावणं अत्यंत शुभ मानलं गेलं आहे. मात्र असा फोटो लावताना एक काळजी घ्यावी, एकट्या राधा किंवा एकट्या कृष्ण यांचा फोटो लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
