आश्रम सीझन 3: जपनाम सुरु करा, बाबा निराला आलेत! बॉबी देओलची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक, कशी असेल कथा?

Aashram Season 3 - Part 2: 'आश्रम' सीरिज नव्या सीझनची सर्वत्र चर्चा... टीझर पाहून चाहत्यांची उत्सुकता पोहोचली शिगेला..., बॉबी देओलची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक, कशी असेल कथा?

आश्रम सीझन 3: जपनाम सुरु करा, बाबा निराला आलेत! बॉबी देओलची एक झलक पाहण्यासाठी चाहते उत्सुक, कशी असेल  कथा?
| Updated on: Jan 31, 2025 | 8:15 AM

Aashram Season 3: एमएक्स प्लेयरने हीट शो ‘आश्रम’ च्या तिसऱ्या सीझनचा दुसऱ्या पार्टचा टीझर प्रदर्शित केला आहे. टीझरमध्ये बाबा निराला सडपातळ आणि भयानक भूमिकेत दिसत आहेत. जो महिलांना स्वतःच्या वासनेचा शिकार बनवतो. पण अखेर त्याचं सत्य सर्वांसमो येतं. नवीन टीझरमध्ये बाबा निरालाची नजर एका नवीन महिलेवर आहे, परंतु शेवटी ती शिकार त्यांच्यासाठी खूप कठीण असू शकते. कारण निराला बाबाचं सत्य समोर येण्यासाठी रचलेला कट आणि गोळीबार… यामुळे कथेला वेगळं वळण मिळणार आहे.

मागच्या सीझनमध्ये आपण पाहिलं की, बाबा आपल्या शक्तीचा वापर करून न्यायालयीन केस पूर्णपणे उलथवून टाकतात. पम्मीवर गुन्हा दाखल करून तिची तुरुंगात रवानगी करण्यात आली. पम्मी तुरुंगात असताना रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या आईचे निधन झाले. आईच्या निधनानंतर बाबा निराला यांना पम्मीची अवस्था कळते आणि तुरुंगात सत्संगाची व्यवस्था करतात, ज्यामुळे त्यांना पम्मीला भेटण्याची संधी मिळते. ज्याची बाबांनी अधिक काळ प्रतीक्षा केलेली असते.

 

‘आश्रम’मध्ये आधी काय झालं?

डीआयजी पम्मी हिच्या विरोधातील आरोप मागे घेण्याचे आणि आश्रममध्ये परतण्याचे आदेश देतात. त्यानंतर पम्मी ‘आश्रम’मध्ये परतते. ‘आश्रम’मध्ये परतल्यानंतर पम्मी बदला घेण्याच्या विचारात असते. , पम्मीने प्रथम आश्रमातील सर्वांना जाणीव करून दिली की ती आता पूर्वीसारखी राहिली नाही आणि ती बाबांच्या भक्तीत पूर्णपणे तल्लीन झाली आहे. पम्मी भोपाला तिच्या प्रेमात वेड लावते, ज्यामुळे भोपा आणि बाबा यांच्यात दुरावा निर्माण होतो.

पम्मीच्या प्लॅनिंगबद्दल काहीही माहिती नसलेल्या बाबाने पम्मीचा विनयभंग केला आणि तिच्याशी संबंध प्रस्थापित केले. तर पम्मीने पूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद केली. या पुराव्यासह ती भोपाच्या मदतीने कोर्टात व्हिडिओ सादर करून बाबा नपुंसक नसल्याचे सिद्ध करते. आता बाबांना निर्दोष सिद्ध करण्यासाठी स्वतःलाचं शुद्धिकरण करण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे आता पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.