AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Govinda | बॉलिवूडमधील गोविंदाचे कट्टर शत्रू ; ‘या’ प्रसिद्ध सेलिब्रिटीने अभिनेत्याच्या लगावली कानशिलात

'या' बॉलिवूड सेलिब्रिटींचं तोंड देखील पाहत नाही अभिनेता गोविंदा... अनेक सेलिब्रिटी अभिनेत्याचे कट्टर शत्रू... सध्या सर्वत्र गोविंदा आणि त्याच्या शत्रूंची चर्चा...

Govinda | बॉलिवूडमधील गोविंदाचे कट्टर शत्रू ; 'या' प्रसिद्ध सेलिब्रिटीने अभिनेत्याच्या लगावली कानशिलात
| Updated on: May 05, 2023 | 12:10 PM
Share

मुंबई : एका काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अभिनेता गोविंदा, सलमान खान, शाहरुख खान यांसारख्या अभिनेत्यांचं राज्य होतं. आता बॉलिवूडमध्ये अनेक नवीन अभिनेत्यांनी पदार्पण केलं असलं तरी, ९० च्या दशकातील अभिनेत्यांची चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली असते. अभिनेता गोविंदा आता मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी, त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्याच्या चर्चा चाहत्यांमध्ये कायम रंगलेल्या असतात. मोठ्या पडद्यावर एकत्र काम करत असतात सेलिब्रिटी एकमेकांसोबत प्रेमाने राहत असतात. पण पडद्याच्या मागे असणारे वाद, भांडणं अनेकदा चाहत्याच्या समोर येतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे एकमेकांसोबत बोलत देखील नाहीत. बॉलिवूडमध्ये गोविंदा याचे देखील अनेक कट्टर शत्रू आहेत. ज्यांचं गोविंदा तोंड देखील पाहत नाही.

अभिनेता संजय दत्त : गोविंदा आणि संजूबाबा यांची जोडी सिनेविश्वातील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक होती. दोघांनी एकत्र अनेक सिनेमांमध्ये काम देखील केलं. पण त्यांची मैत्री फार काळ टिकू शकलं नाही. कालांतराने दोघांमध्ये वाद रुंगू लागले.

दिग्दर्शक करण जोहर : करण जोहर याने आजपर्यंत अनेक सेलिब्रिटींना त्याच्या सिनेमांमध्ये संधी दिली. एवढंच नाही तर, करण जोहर याला बॉलिवूडचा ‘गॉडफादर’ देखील म्हणतात. पण एकदा गोविंदा याने करण जोहर याचा उल्लेख बॉलिवूडमधील सर्वात भयानक व्यक्ती म्हणून केला होता.

दिग्दर्शक डेविड धवन : डेविड आणि गोविंदा यांची बॉलिवूडमध्ये बेस्ट दिग्दर्शक – अभिनेत्याची जोडी म्हणून ओळख होती. पण डेविड धवन यांनी एका सिनेमात गोविंदा याला कास्ट न केल्यामुळे दोघांमधील वाद वाढले. त्यानंतर डेविड आणि गोविंदा कधीही एकत्र दिसले नाहीत.

अभिनेता सलमान खान : गोविंदा आणि सलमान खान यांच्या जोडीची देखील बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख होती. ‘पार्टनर’ सिनेमातील दोघांच्या मैत्रीला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. पण कालांतराने दोघांची मैत्री तुडली. आज दोघे कधीही एकत्र दिसत नाहीत.

अभिनेते अमरीश पुरी : अमरीश पुरी आज या जगात नसले तरी, त्यांच्या अनेक आठवणी आजही चाहत्यांमध्ये जिवंत आहेत. अमरीश पुरी आजही अनेकांच्या प्रेरणा स्थानी आहेत. पण गोविंदा आणि अमरीश पुरी यांच्यामध्ये वाद होते. दोघांमध्ये अनेक भांडणं होती. सेटवर आल्यानंतर दोघांमध्ये भांडणं झाली. तेव्हा अमरीश पुरी यांनी गोविंदाच्या कानशिलात लगावली होती….

गोविंदा आज मोठ्या पडद्यावर सक्रिय नसला तरी, त्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर कायम गोविंदाचे याचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं