जितेंद्र कपूर यांनी छोट्या जमिनीच्या तुकड्यापासून सुरु केलेला व्यवसाय, कोट्यवधींचा फायदा
Bollywood Actor Jeetendra: वयाच्या 62 व्या वर्षी जितेंद्र यांनी सुरु केलेल्या व्यवसायामुळे आज होतोय पैशांचा पाऊस, छोट्या जमिनीच्या तुकड्यावर सुरु केलेला व्यवसाय

Bollywood Actor Jeetendra: दिग्गज अभिनेते जितेंद्र आज अभिनय विश्वात सक्रिय नसले तरी आज कोट्यवधींची माया कमावतात. नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात टीव्ही क्विन एकता कपूर हिने वडिलांबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. एकता कपूर हिने वडिलांच्या रियल इस्टेट व्यवसायाबद्दल खुलासा केला आहे. गेल्या काही वर्षांपासून जितेंद्र रियल इस्टेट व्यवसायात सक्रिय आहेत. कार्यक्रमात एकता कपूर हिला विचारण्यात आलं की, मुंबईतील रियल इस्टेटचा अर्धा भाग जितेंद्र यांच्याकडे आहे… यावर एकता हिने स्पष्टीकरण दिलं.
एकता कपूर म्हणाली, ‘असं काहीही नाही, फक्त माझ्या वडिलांनी रियल इस्टेट व्यवसायात चांगली प्रगती केली आहे. त्यांनी वयाच्या 65 व्या वर्षी व्यवसाय सुरु केला आणि आज ते 83 वर्षांचे आहेत. एका छोट्या जमिनीच्या तुकड्यापासून त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. या व्यवसायात ते प्रचंड समाधानी आहे… त्यांच्या कामावर त्यांचं प्रेम आहे… ‘
‘त्यांचा व्यवसाय फार मोठा नाही. ते मुंबईतील मोठ्या बिल्डरांपैकी एक नाहीत, पण जे काही छोटं – मोठं आज त्यांच्याकडे आहे. ती फक्त आणि फक्त त्यांची मेहनत आहे. रियल इस्टेट व्यवसायामुळे त्यांना त्यांचं तरुणपण जगता येत आहे… आणि मला असं वाटतं की हे फार चांगलं आहे… माझ्या व्यवसायापेक्षा मला त्यांच्या व्यवसायावर अधिक गर्व आहे… त्यांच्याकडून मी महत्त्वाची गोष्ट शिकली आहे आणि ती म्हणजे पुन्हा नव्याने सुरुवात… पूर्वीच्या प्रोफेशनमध्ये नाही तर, ते नवी गोष्ट करत आहेत…’ असं देखील एकता म्हणाली.
एवढंच नाही तर, वडिलांच्या स्वभावाबद्दल एकताने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘आमच्या घरातील सर्वात शांत व्यक्ती म्हणजे माझे वडील आहे. ते कायम आम्हाला चांगल्या – वाईट गोष्टी सांगत असतात.’ भाऊ तुषार कपूर याच्याबद्दल देखील एकताने सांगितलं.
‘तुषार कपूर एक उत्तम बाप आहे. आई प्रमाणे तो त्याच्या बाळाची काळजी घेत असतो… बाळाचा सांभाळ करण्यासाठी महिलांकडून ज्या अपेक्षा बाळगल्या जातात त्या तुषार उत्तम प्रकारे करतो…’ असं देखील एकता म्हणाली.
