
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रमाणात दिवसागणिक वाढ होत आहे. फक्त बाहेरच नाही तर, घरात देखील महिलांना कठीण प्रसंगांचा सामना करावा लागत आहे. सुनांवर होणारे अत्याचार, सासर त्यांना मिळत असलेली दुय्यम दर्जाची वागणूक, हुंड्यासाठी होणारी मारहाण… या सगळ्याचा शेवट सूनेच्या हत्येने आणि आत्महत्येने होतो… काही दिवासांपूर्वी वैष्णवी हगवणे हिने सासरच्या जाचाला कंटाळून स्वतःचं आयुष्य संपवलं… तिच्यानंतर अनेक महिलांना सासरच्या छळाला कंटाळून आयुष्य संपवलं… एकीकडे सुनांची हत्या, आत्महत्या होत आहे, तर दुसरीकडे मिथुन चक्रवर्तींचं सुनेशी कसं नातं आहे… याचीच चर्चा सुरु आहे.
मिथुन चक्रवर्ती यांच्या सूनेबद्दल सांगायचं झालं तर, लोकप्रिय मालिका ‘अनुपमा’ मध्ये खलनायिकेची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्मी मिथुन दा यांची सून आहे. मदालसा हिने मिथुन दा मुलगा मिमोह याच्यासोबत लग्न केलं आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत मदालसा हिने सासरच्या व्यक्तींसोबत कसं नातं आहे आणि सासरी कशी वागणूक मिळते.. याबद्दल सांगितलं आहे.
मदालसा म्हणाली, ‘लग्नाआधीच मी माझी ओळख निर्माण केली होती. लग्नानंतर ज्या कुटुंबात मी सून म्हणून गेली, त्या कुटुंबाने कधीच माझी ओळख नाहिशी करण्याचा प्रयत्न केला नाही… त्यांनी मला अत्यंत चांगल्या प्रकारे स्वीकारलं. मला स्वतःला बदलायची कधीच गरज लागली नाही…’
मिथुन दा खूप चांगले कुक आहेत… असं देखील मदालसा हिने सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, ‘असा कोणताच पदार्थ नाही जो त्यांना बनवता येत नाही… ते स्वतःची वेगळी रेसिपी तयार करतात… ते महिन्याचे 28 दिवस शूट करत असतात… पण जेव्हा घरी असतात, तेव्हा ते स्वयंपाक करतात…’ असं देखील मदालसा म्हणाली.
मदालसा हिच्या प्रोफेशनल आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, ती टीव्ही विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे, ‘अनुपमा’ मालिकेनंतर तिने ‘द बंगाल फाइल्स’ सिनेमात देखील दिसली होती… मदालसा सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचं फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.