रणवीर सिंगलाही पडली अलिबागची भुरळ ! तरुणांसोबत क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात

अलिबागचे मनमोहक सागरी किनारे, निसर्ग सौंदर्याची मोहिनी कुणाला न पडावी तर नवलच...! बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग हा प्रचंड लोकप्रिय आहे. रणवीरलाही अलिबागची चांगलीच भुरळ पडली आहे. रणवीर सिंगने नुकतंच अलिबागमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला.

रणवीर सिंगलाही पडली अलिबागची भुरळ ! तरुणांसोबत क्रिकेट खेळत केली चौके-छक्यांची बरसात
Follow us
| Updated on: Feb 28, 2024 | 2:01 PM

रवी खरात, टीव्ही9 प्रतिनिधी, अलिबाग | 28 फेब्रुवारी 2024 : अलिबागचे मनमोहक सागरी किनारे, निसर्ग सौंदर्याची मोहिनी कुणाला न पडावी तर नवलच…! बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग हा प्रचंड लोकप्रिय आहे. रणवीरलाही अलिबागची चांगलीच भुरळ पडली आहे. रणवीर सिंगने नुकतंच अलिबागमध्ये येऊन आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला. अलिबागचे माजी आमदार स्वर्गीय मधुकर ठाकूर यांच्या सातीर्जे येथील निवासस्थनी रणवीर सिंग याने सदिच्छा भेट दिली. यावेळी त्याने गावातील तरुणांसोबत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. रणवीरचे आगमन होताच ठाकूर कुटुंबियांकडून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. प्राची ठाकूर आणि कटुंबातील महिलांनी त्याचे औक्षण केले.

यावेळी स्व. मधुकर ठाकूर यांचे चिरंजीव तथा रायगड जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, त्यांचे मोठे बंधू रवी उर्फ नाना ठाकूर, मालती ठाकूर, मीनाक्षी ठाकूर, कळल ठाकूर आणि ठाकूर परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते.

सर्वांत मिळून-मिसळून वावरला रणवीर

बॉलिवूडमधील एक आघाडीचा अभिनेता असूनही रणवीर सिंगचं वागणं अगदी साधं असत. चित्रविचित्र कपडे, फॅशन सेन्स यामुळे रणवीर कितीही चर्चेत असता, तरी त्याचे पाय नेहमीच जमीनीवर असतात. तो नेहमी सर्वसामान्यांमध्ये मिळू-मिसळू वागतो. त्याचं हेच स्वभव वैशिष्ट्य अलिबागकरांनाही भावलं. राजाभाऊ ठाकूर यांचे थोरले बंधू ॲड. प्रवीण ठाकूर यांची मुलगी धनश्री ठाकूर हिच्या वाढदिवसानिमित्ताने यावेळी केक कापण्यात आला. त्या आनंदातही रणवीर सिंग सहभागी झाला. एक आघाडीचा अभिनेता असूनही त्याचे वावरणे हे सर्वांना आपलेसे करणारे होते.

तरूणांसोबत लुटला क्रिकेटचा आनंद

सर्वांबरोबर हास्य विनोदात काही क्षण रमल्यानंतर रणवीरला क्रिकेट खेळण्याचा मोह आवरता आला नाही. गावातील मुलांसोबत त्याने क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी त्याने उत्तम फलंदाजी केली. अभिनयासोबत तो चांगला क्रिकेट खेळतो, हेदेखील त्याने दाखवून दिले. रणवीर सिंग नेहमीच अलिबागला येत असतो. अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण या फेमस जोडीने ९० गुंठे जागा २२ कोटी रुपयांना खरेदी केली आहे. रणवीर आणि दीपिकाच्या या जागेत २ बंगले असून नारळ, सुपारीची मोठी बाग देखील आहे.

बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?
बीड हत्या प्रकरणाचा तपास करणारे 'हे' अधिकारी बदलले, नवे अधिकारी कोण?.
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्..
वाल्मिक कराड समर्थक परळीत आक्रमक, टॉवरवर चढून आंदोलन; एकाला भोवळ अन्...