छोट्या पुढारीचे रितेश देशमुख याने थेट पिळले कान, म्हणाला, तुम्ही ज्यावेळी…

'बिग बॉस मराठी सीजन 5'चा फिनाले नुकताच झालाय. विशेष म्हणजे हे सीजन धमाका करताना दिसले. मुळात म्हणजे या सीजनबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी क्रेझ ही सुरूवातीपासूनच बघायला मिळाली. आता सूरज चव्हाण याच्या माध्यमातून बिग बॉस मराठी सीजन 5 ला त्याचा विजेता मिळालाय.

छोट्या पुढारीचे रितेश देशमुख याने थेट पिळले कान, म्हणाला, तुम्ही ज्यावेळी...
Ghanshyam Darode and Riteish Deshmukh
| Updated on: Oct 08, 2024 | 11:50 AM

बिग बॉस मराठी सीजनचा फिनाले झाला असून सूरज चव्हाण हा बिग बॉस मराठीचा विजेता ठरलाय. विशेष म्हणजे टीआरपीमध्येही हे सीजन सुरूवातीपासूनच धमाल करताना दिसले. सूरज चव्हाण याला तरूणाईचा मोठा सपोर्ट मिळाला. सूरज हा बिग बॉसच्या घरात तुटलेली चप्पल घालून आणि दोन जोडी कपडे घेऊन दाखल झाला होता. बिग बॉसच्या निर्मात्यांकडून सूरजला 14 लाखांचे बक्षिस मिळाले. अभिजीत सावंत हा ‘बिग बॉस मराठी सीजन 5’चा उपविजेता ठरलाय. निकी तांबोळी ही देखील टॉप 3 पर्यंत पोहोचली. रितेश देशमुख याने हे सीजन होस्ट केले.

बिग बॉसच्या घरातून बाहेर पडलेले स्पर्धेक देखील या फिनालेसाठी पोहोचले होते. यावेळी काहींनी जबरदस्त डान्स देखील केले. घनश्याम दरोडे ऊर्फ छोटा पुढारी हा बिग बॉसच्या फिनालेला पोहोचला होता. धनश्याम दरोडे हा बिग बॉसच्या घरात चांगला गेम खेळताना दिसला होता. मात्र, नॉमिनेशनमध्ये कमी मत पडल्याने तो बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला.

फिनालेमध्ये पोहोचलेल्या घनश्याम दरोडे याचे कान टोचताना रितेश देशमुख हा दिसलाय. रितेश देशमुख हा म्हणाला की, काय घनश्याम तुम्ही बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर सतत मोठ्या मुलाखती देताना दिसत आहेत. तुम्ही तर चांगलेच प्रसिद्ध झाले आहात…यावेळी नाही सर नाही सर म्हताना घनश्याम हा दिसला.

पुढे रितेश देशमुख हा थेट म्हणाला की, तुम्ही बऱ्याच मुलाखतीमध्ये हे म्हणताना दिसले की, तुम्ही बिग बॉसच्या घराबाहेर पडला आणि बिग बॉसचा टीआरपीच कमी झाला…पण तसे नसून ज्यावेळी तुम्ही बिग बॉसच्या घरात होता त्यावेळी तुमच्या उंची इतका बिग बॉसचा टीआरपी होता आणि तुम्ही बाहेर पडल्यानंतर तो टीआरपी माझ्याही उंचीपेक्षा खूप जास्त उंच गेला.

यावेळी हो सर अगदी बरोबर असल्याचे म्हणताना घनश्याम दरोडे हा दिसला. यावेळी रितेश देशमुख हा पुढे हसताना देखील दिसला. धनश्याम दरोडे याला रितेश देशमुख याने चांगलेच फटकारल्याचे बघायला मिळाले. छोट्या पुढारीचा गेम लोकांनाही चांगलाच आवडताना दिसला. धनश्याम दरोडे, अरबाज खान आणि निकी तांबोळी यांची जोडी लोकांना आवडली होती.