
Salman Khan: बॉलिवूडचा ‘दबंग’ खान म्हणजेच अभिनेता सलमान खान फक्त त्याच्या प्रोफेशनल आयुष्यामुळेच नाही तर, खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेच असतो. सलमान खान याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेता वयाच्या 59 व्या वर्षी देखील अविवाहित आहे. पण नुकताच झालेल्या एका कार्यक्रमात अभिनेत्याने बाप होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सांगायचं झालं तर, सलमान नुकताच काजोल आणि ट्विंकल खन्नाच्या “टू मच विथ काजोल अँड ट्विंकल खन्ना” या टॉक शोच्या पहिल्या भागात पाहुणा म्हणून आला होता. या भागात त्याने लवकरच वडील बनण्याची इच्छा असल्याचे उघड केले.
बाप होण्याची इच्छा व्यक्त करत अभिनेता सलमान खान म्हणाला, ‘मुलं एक दिवस नक्कीच होतील… लवकरच होतील… मी लवकरच एके दिवशी बाप होईल… पुढे काय होतं ते पाहू…’ असं म्हणत सलमान खान याने त्याच्या रिलेशनशिपबद्दल देखील मोठं वक्तव्य केलं.
रिलेशनशिपबद्दल अभिनेता म्हणाला, ‘जेव्हा एक जोडीदार समोरच्या व्यक्तीच्या पुढे जातो, अधिक यश संपादन करतो… तेव्हा वाद सुरु होतात… तेव्हाच असुरक्षिततेच्या भावना मनात घर करू लागतात. त्यामुळे दोघांनाही विचार करुन, योग्य निर्णय घेऊन पुढे जावं…’ असं देखील सलमान खान म्हणाला.
सलमान खान म्हणाला, ‘दोघांना एकमेकांवर असलेलं ओझ कमी करायला हवं… असं मला वाटतं… नाही जमलं तर नाही जमलं… जर कोणाला जबाबदार ठरवायचं असेल तर, मी स्वतःला जबाबदार ठरवेल…’, याआधी देखील सलमान खान अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यावर स्पष्ट बोलला आहे…
सलमान खान याच्या अफेअर्सबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेत्याने अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींना डेट केलं आहे. पण कोणत्याच अभिनेत्रीसोबत सलमान खान याचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबत सलमान खान याच्या नावाची चर्चा तुफान रंगली.
सांगायचं झालं, ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्या अफेअरच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये सुरु असतात. एक काळ असा होता, जेव्हा दोघे चाहत्यांना कपल गोल्स देत होते. पण दोघांचं नातं फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पण दोघांच्या नात्याचा अंत फार वाईट झाला.