Shahid Kapoor | ‘या’ चित्रपटासाठी शाहिद कपूर याने घेतली नाही फिस, अभिनेत्याने केला मोठा खुलासा
बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर याने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. शाहिद कपूर याची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. शाहिद कपूर हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो.

मुंबई : बाॅलिवूड अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) हा कायमच चर्चेत असतो. शाहिद कपूर याने काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये शाहिद कपूर हा पत्नी मीरा राजपूत हिला लग्न (Marriage) वाढदिवसाच्या अत्यंत खास प्रकारे शुभेच्छा देताना दिसला. मीरा राजपूत आणि शाहिद कपूर हे अनेकदा स्पाॅट होतात. काही दिवसांपूर्वीच वरळीमध्ये अत्यंत खास घरामध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत शिफ्ट झाले. विशेष म्हणजे शाहिद कपूर याच्या या घराची किंमत कोट्यवधीच्या घरात आहे.
शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचे हे घर अत्यंत आलिशान आहे. बऱ्याच वेळा मीरा राजपूत ही सोशल मीडियावर तिच्या या घरातील फोटो शेअर करताना दिसते. एका मुलाखतीमध्ये मीरा राजपूत हिने मोठा खुलासा करत थेट म्हटले होते की, मला स्टार किड्स या शब्दाची चिड येते. मला माझ्या मुलांना स्टार किड्स म्हटले की, एक प्रचंड राग येतो.
शाहिद कपूर याने नुकताच एक मुलाखत दिलीये. या मुलाखतीमध्ये शाहिद कपूर हा मोठा खुलासा करताना दिसलाय. शाहिद कपूर म्हणाला की, मी हैदर या चित्रपटासाठी काहीच फिस घेतली नाही. त्याचे कारण म्हणजे मी जर चित्रपटासाठी काही फिस घेतली असती तर तो चित्रपट तयारच होऊ शकला नसता. चित्रपटाकडे फार काही बजेट नव्हते.
2014 हैदर हा चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात शाहिद कपूर हा मुख्य भूमिकेत दिसला. विशेष म्हणजे या चित्रपटाने मोठा धमाका केला. या चित्रपटासाठी शाहिद कपूर याचे काैतुक देखील करण्यात आले. मात्र, या चित्रपटासाठी शाहिद कपूर याने एकही रूपये फिस घेतली नाही हे अत्यंत विशेष. आता शाहिद कपूर याचा हा खुलासा ऐकून चाहतेही हैराण झाल्याचे बघायला मिळतंय.
विशेष म्हणजे शाहिद कपूर याला हैदर चित्रपटाच्या अभिनयासाठीच बेस्ट अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला. मीरा राजपूत हिच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर शाहिद कपूर हा कपूर कपूर हिला डेट करत होता. इतकेच नाही तर दोघे लग्न करणार असल्याचे देखील सांगितले जात होते. मात्र, करीना कपूर हिच्या आईला अजिबातच शाहिद कपूर हा आवडला नाही. यांच्या रिलेशनला करीना कपूर हिच्या आईचा विरोध होता.