AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shahrukh Khan याची मॅनेजर पूजा ददलानी कमावते कोट्यवधी रुपये; आकडा हैराण करणारा

Shahrukh Khan | कोट्यवधी रुपयांच्या मालकाची मॅनेजर देखील कोट्यधीश; किंग खान याची मॅनेजर पूजा ददलानी हिची कमाई जाणून व्हाल थक्क... सध्या सर्वत्र किंग खान याच्या मॅनंजरची चर्चा

Shahrukh Khan याची मॅनेजर पूजा ददलानी कमावते कोट्यवधी रुपये; आकडा हैराण करणारा
| Updated on: Sep 06, 2023 | 2:08 PM
Share

मुंबई : 6 सप्टेंबर 2023 | अभिनेता शाहरुख खान याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सोशल मीडियावर देखील किंग खान याच्या फॉलोअर्सची संख्या प्रचंड मोठी आहे. पण शाहरुख खान फक्त ६ जणांना फॉलो करतो. त्या ६ जणांमध्ये अभिनेत्याचं कुटुंब आणि मॅनेजर पूजा ददलानी देखील आहे. पूजा ददलानी गेल्या अनेक वर्षांपासून शाहरुख खान याच्यासाठी काम करते. एवढंच नाही तर, अभिनेत्याच्या चांगल्या – वाईट काळात देखील पूजा कायम खान कुटुंबासोबत असते. शाहरुख खान याच्या व्यस्त वेळापत्रकाचं नियोजन पूजा करते. किंग खान याच्या अनेक कांमाची जबाबदारी पूजा हिच्यावर असते. शाहरुख खान बॉलिवूडचा फक्त अभिनेता नसून प्रसिद्ध उद्योजक देखील आहे.

बॉलिवूड आणि उद्योगांच्या माध्यमातून किंग खान कोट्यवधी रुपये कमावतो. फक्त किंग खान नाही तर, अभिनेत्याची मॅनेजर पूजा ददलानी देखील कोट्यवधी रुपये कमावते. तर आज पूजा ददलानी हिच्या संपत्तीबद्दल जाणून घेवू. किंग खान याची मॅनेजर पूजा देखील अभिनेत्याच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध आहे.

पूजा ददलानी हिला किती वेतन देतो किंग खान?

पूजा ददलानी २०१२ पासून अभिनेता शाहरुख खान याच्यासाठी काम करते. किंग खान याच्या मॅनेजरची महिन्याची कमाई जवळपास ८ कोटी आहे. म्हणजे पूजा हिचं महिन्याचं मानधन ६६ लाख रुपये आहे. पूजा कायम तिच्या लाईफ स्टाईलमुळे देखील चर्चेत असते. सोशल मीडियावर पूजा कायम तिच्या मुलीसोबत फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.

पूजा ददलानी तिच्या सोशल मीडियावर किंग खान याच्या आगामी सिनेमांचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. सोशल मीडियावर पूजा हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. तर किंग खान लवकरच ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सर्वत्र शाहरुख खान याच्या ‘जवान’ सिनेमाची चर्चा रंगत आहे.

7 सप्टेंबर रोजी किंग खान ‘जवान’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये दिसत आहेत.  किंग खान सोशल मीडियावर सिनेमाबद्दल अपडेट पोस्ट करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत आहे. ‘पठाण’ सिनेमाच्या यशानंतर ‘जवान’ सिनेमाला चाहते किती प्रेम देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?