AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Net Worth | गरजूंना मदतीचा हात देऊन ‘मसीहा’ ठरलेल्या सोनू सूद्ची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या…

लॉकडाऊनच्या काळात लोकांना केलेल्या मदतीमुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देशभरात ‘मसीहा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सोनूला देशभरातून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे.

Net Worth | गरजूंना मदतीचा हात देऊन ‘मसीहा’ ठरलेल्या सोनू सूद्ची संपत्ती नेमकी किती? जाणून घ्या...
सोनू सूद
Harshada Bhirvandekar
Harshada Bhirvandekar | Edited By: Anish Bendre | Updated on: Jun 01, 2021 | 9:02 AM
Share

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात लोकांना केलेल्या मदतीमुळे बॉलिवूड अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) देशभरात ‘मसीहा’ म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. सोनूला देशभरातून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळत आहे. अभिनेता सोनू सूदचा जन्म पंजाबमधील एका गावात झाला होता. त्यानंतर तो अभिनेता होण्यासाठी मुंबईत आला. या अभिनेत्याने हिंदी, तेलुगु, तामिळ, कन्नड आणि पंजाबी चित्रपटांमध्ये दमदार अभिनय केला आहे. लॉकडाऊन दरम्यान गरजवंतांना आवश्यक ती सगळी मदत करणाऱ्या सोनूकडे नेमकी किती संपत्ती (Net Worth) आहे? चला तर जाणून घेऊया…( Bollywood Actor Sonu Sood net worth)

caknowledge.com नुसार सोनू सूदकडे एकूण 130 कोटींची संपत्ती आहे. सोनू सूद गेल्या 2 दशकांपासून बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करत आहे. ज्यामुळे त्याची फॅन फॉलोईंग खूप जबरदस्त आहे. ब्रँड अ‍ॅन्डॉर्समेंट ही त्याच्या उत्पन्नाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. त्याने सलमान खानसोबत ‘दबंग’ या चित्रपटामध्येही काम केले आहे. त्याचवेळी शाहरुख खानसोबत ‘हॅपी न्यू इयर’ मध्ये काम केले होते. सोनू आपल्या पत्नी आणि मुलांसमवेत मुंबईत राहतो. सोनू सूद याच्या पत्नीचे नाव सोनाली सूद आहे. सोनू नागपुरात शिकत असताना त्याची सोनालीशी भेट झाली. याचदरम्यान दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि दोघांनी 1996मध्ये लग्न केले.

सोनू आणि त्याची पत्नी सोनाली  :

View this post on Instagram

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

घर, हॉटेल आणि कॅफेचा मालक!

सोनू सूद मुंबईतील लोखंडवाला भागात 2600 चौरस फुटांच्या घरात राहतो. सोनूचे हे घर 4 बीएचके आहे. यासह सोनूचे मुंबईत आणखी दोन फ्लॅट आहेत. त्याच वेळी, त्याचे जुहूमध्ये एक हॉटेल देखील आहे. याशिवाय सोनूचे मुंबईतही काही कॉफी पॉईंट्स आहेत. जिथे बसून लोक कॉफी पीत संध्याकाळचा आनंद घेतात (Bollywood Actor Sonu Sood net worth).

गाड्यांचाही शौक

सोनू सूदकडे एक मर्सिडीज बेंझ एमएल क्लास 350 सीडीआय कार आहे. या कारची किंमत 66 लाख रुपये आहे. त्याच वेळी, त्याच्याकडे ऑडी क्यू 7 ही कार देखील आहे. या गाडीची किंमत 80 लाख रुपये आहे. इतकेच नाही, तर त्याच्याकडे पोर्शची पनामा कार देखील आहे, ज्याची किंमत 2 कोटी आहे. सोनू सूदला इशांत आणि अयान नावाचे दोन मुलगे आहेत, ते कधीकधी वडिलांसोबत फिरताना दिसतात.

‘मसीहा’ सोनू!

अभिनेता सोनू सूदने या कठीण काळात मदतीचा हात पुढे करत भारतीयांच्या हृदयात ज्याप्रकारे स्थान निर्माण केले आहे, ते विशेष आहे. लोकांना मदत करण्यात अभिनेता नेहमीच पुढे असतो. गेल्या वर्षापासून तो दररोज हजारो लोकांना मदत करत आहे. त्याने लोकांना घरं, पैसा, औषध आणि नोकर्‍या देखील उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्याच्या घरी आजकाल लोकांची गर्दी दिसत आहे. सोनू राहत असलेल्या ठिकाणी लोक त्याच्याकडे मदत मागण्यासाठी येत आहेत.

(Bollywood Actor Sonu Sood net worth)

हेही वाचा :

Photo : दिसायलाही हेमा मालिनीसारखीच, सौंदर्यातही तसूभर कमी नाही; या तरुणीचे फोटो पाहून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

Video | ‘शेरनी’मध्ये विद्या बालन दिसणार धडाकेबाज वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत, पाहा जबरदस्त टीझर

Follow Us
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...
यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान
Sharad Pawar : यायचे असेल तर आमच्यात या, विलिनीकरणावर शरद पवारांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू
मॅनहोलमध्ये काम करताना कामगाराचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार
रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड
Video : रकुल प्रीत , वासू भगनानी आयकर विभागाच्या रडारवर; अनेक ठिकाणी धाड, सिनेमांच्याआड पैशांची लपवालपवी?