
Dharmendra Prayer Meet Video : बॉलिवूडचे प्रसिद्ध आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सिनेविश्वात शोककळा पसरली आहे. तर, चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. 24 नोव्हेंबर रोजी धर्मंद्र यांनी अखेरचा श्वास घेतला. पण आजही त्यांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुसरीकडे, वडिलांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल याची देखील पहिली प्रतिक्रिया समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ ब्यूटी फोटोग्राफर टीना देहल हिने पोस्ट केला आहे.. यावर सनी देओल याच्यासोबतच अभिनेता बॉबी देओल, करण देओल, अभय देओल आणि इतरांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.
टीना हिने स्वतःच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला. ज्यामध्ये धर्मेंद्र यांचे आठवणीत राहणारे फोटो आहे. पोस्ट शेअर करत टीना हिने ‘या जादूसाठी आभार…. इतक्या लहान वयात सिनेमांच्या जादूची ओळख करून दिल्याबद्दल, आम्ही सर्वांनी जादूचं अनुसरण केलं. काहींनी कॅमेऱ्यासमोर, काहींनी कॅमेऱ्याच्या मागे… तर काहींनी कलाकार म्हणून… जादू अद्याप जिवंत आहे…’ असं कॅप्शनमध्ये लिहिलं आहे.
टीना हिच्या पोस्टवर सनी देओल याने लाल हार्ट इमोजी कॅप्शनमध्ये पोस्ट केलेत… सध्या पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ धर्मेंद्र यांच्या शोक सभेचा आहे…ज्याचं शिर्षक ‘सेलिब्रेशन ऑफ लाइफ’ असं होतं… 27 नोव्हेंबर रोजी धर्मेंद्र यांच्यासाठी शोक सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली आणि धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली…
धर्मेंद्र यांच्या शोक सभेबद्दल सांगायचं झालं तर, मुंबईत सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. पण शोक सभेसाठी अभिनेत्री हेमा मालिनी आणि त्यांच्या दोन मुली ईशा देओल, आहाना देओल उपस्थित नव्हत्या… हेमा मालिनी यांनी त्यांच्या घरी धर्मेंद्र यांच्यासाठी पूजाचे आयोजन केलं होतं… अशात धर्मेंद्र यांच्या शोक सभेसाठी हेमा मालिनी दिसल्या नाहीत, म्हणून अनेक चर्चा सुरु होत्या…
धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्याबद्दल सांगायचं झालं. हेमा मालिनी, धर्मेंद्र यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. म्हणून लग्नाच्या 45 वर्षांनंतर देखील हेमा कधीच धर्मेंद्र यांच्या घरीची पायरी चढल्या नाहीत. तर शेवटच्या क्षणी देखील धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची भेट झाली नाही.. अशी देखील चर्चा रंगली.