AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sunny Deol : ‘लोकं मला मुर्ख समजायचे’, गंभीर आजाराने ग्रस्त सनी देओल यांचा मोठा खुलासा

Sunny Deol : गंभीर आजाराचा सामना केलेल्या सनी देओल यांचा मोठा खुलासा, आजाराची लक्षणं हैराण करणारी... 'या' आजाराचा सामना करत असताना सनी देओल यांना लोकं समजू लागली होती मुर्ख, सर्वत्र सनी देओल यांच्या आजारीची चर्चा...

Sunny Deol : 'लोकं मला मुर्ख समजायचे', गंभीर आजाराने ग्रस्त  सनी देओल यांचा मोठा खुलासा
| Updated on: Dec 12, 2023 | 12:20 PM
Share

मुंबई| 12 डिसेंबर 2023 : अभिनेते सनी देओल यांच्या ‘गदर 2’ सिनेमाने चाहत्यांच मनोरंजन केलं. अभिनेता सनी देओल आणि अभिनेत्री अमिषा पटेल स्टारर ‘गदर 2’ सिनेमा यंदाच्या वर्षातील सुपरहीट सिनेमा ठरला आहे. सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या सनी देओल यांच्याबद्दल एक मोठी गोष्ट सध्या समोर येत आहे. नुकताच झालेल्या मुलाखतीत खुद्द सनी देओल यांनी मोठा खुलासा केला आहे. सनी देओल यांनी त्यांना झालेल्या गंभीर आजाराबद्दल मोठा खुलासा केला आहे. गंभीर आजारामुळे सनी देओल त्रस्त होते. एवढंच नाही तर, लोकं त्यांना मुर्ख देखील समजू लागले होते..

मुलाखतीत सनी देओल म्हणाले, सनी देओल डिस्लेक्सिया आजाराने त्रस्त होते. शाळेत असतना सनी देओल डिस्लेक्सिया या गंभीर आजाराच्या विळख्यात असल्याचं निदान झालं होतं. गंभीर आजारामुळे सनी देओल यांना स्क्रिप्ट वाचायला देखील अनेक अडचणी यायच्या. एवढंच नाही तर, डायलॉग बोलताना देखील सनी देओल यांना त्रास व्हायचा.

सनी देओल यांच्या म्हणण्यानुसार, फक्त डायलॉग नाही तर, अभिनेत्याला लिखाण करायला देखील त्रास व्हायचा. म्हणून सनी देओल हिंदी भाषेतून डायलॉग मागायचे आणि अनेकदा डायलॉग बोलण्याचा प्रयत्न करायचे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी देओल यांच्या आजाराची चर्चा रंगली आहे.

‘आजाराचा सामना करत असताना लोकं माझ्याकडे पाहात राहायचे. त्यांना मी मुर्ख वाटायचो…’ असं देखील सनी देओल म्हणाले. सनी देओल कायम त्यांच्या खासगी आणि प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असतात. एवढंच नाही तर, सोशल मीडियावर देखील सनी देओल कायम चर्चेत असतात.

वयाच्या 66 व्या वर्षी देखील सनी देओल चाहत्यांचं मनोरंजन करत आहेत. सोशल मीडियावर देखील सनी देओल यांची चर्चा रंगलेली असते. सनी देओल देखील चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असतात. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सनी देओल यांची चर्चा रंगली आहे.

सनी देओल यांचे आगामी सिनेमा

सनी देओल यांच्या आगामी सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेते लवकरच ‘सफर’ आणि ‘लाहौर 1947’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या सनी देओल ‘सफर’ सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. चाहते देखील सनी देओल यांच्या आगामी सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.

Follow Us
मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा
Manoj Jarange | मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर उपोषणाचा कडक इशारा; मुंबईत मराठ्यांना येण्याचे आवाहन
असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद अंतिम टप्प्यात. असीम सरोदे यांचे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर विश्लेषण
धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
शिवसेना पक्षचिन्ह सुनावणी: धनुष्यबाण गोठवून पक्ष ठाकरेंना देणार, सरोदे यांचा दावा
मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
भावेश कावरेच्या वादग्रस्त जाहिरातीवरून राज्यात संताप: मांसाहार करणाऱ्यांना घर नाही म्हणण्यावर टीकेची झोड
तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
नीट परीक्षा आणि तामिळनाडूच्या निर्णयावरून अमित ठाकरेंनी केला सरकारवर प्रहार
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक