विद्युत जामवालचा 20 मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल, पाहून सर्वच चाहते थक्क, नेमकं व्हिडीओमध्ये काय?

विद्युत जामवाल हा नेहमी त्याच्या अभिनय आणि फिटनेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतो. अशातच आता त्याचा 20 मिनिटांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. जो पाहून अनेक चाहते थक्क झालेत.

विद्युत जामवालचा 20 मिनिटांचा व्हिडीओ व्हायरल, पाहून सर्वच चाहते थक्क, नेमकं व्हिडीओमध्ये काय?
Image Credit source: Social media
| Updated on: Oct 05, 2026 | 7:00 PM

अभिनेता विद्युत जामवाल आपल्या दमदार अभिनयासोबतच फिटनेस, मार्शल आर्ट्स आणि मानसिक एकाग्रतेसाठीही ओळखला जातो. त्याच्या शारीरिक क्षमतेची अनेकदा चर्चा होताना दिसते. आता मात्र त्याचा एक वेगळाच व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, या व्हिडिओने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडिओमध्ये विद्युत तब्बल 20 मिनिटे डोळे न मिचकावता ध्यान करताना दिसत आहे.

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये विद्युत शांतपणे एका ठिकाणी बसून ध्यान करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, ध्यान करताना त्याचे डोळे उघडे असल्याचे दिसत आहे. तो बराच वेळ डोळ्यांची पापणी लवत नाही. सलग 20 मिनिटे अशाप्रकारे एकाग्रतेने बसून राहिल्याने त्याच्या डोळ्यांतून पाणी येताना स्पष्टपणे दिसते. मात्र, तरीही विद्युतची एकाग्रता कुठेही ढळताना दिसत नाही.

Loading...

डोळ्यांतून पाणी आलं, तरी एकाग्रता कायम

सामान्यपणे डोळे न मिचकावता बराच वेळ राहणे अनेकांसाठी कठीण असते. त्यामुळे विद्युत जामवालचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. डोळ्यांतून अश्रू येत असतानाही तो आपले ध्यान आणि एकाग्रता कायम ठेवताना दिसतो. त्याच्या या कृतीमुळे त्याची मानसिक ताकद आणि संयम पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

विद्युतचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये त्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अनेक जण त्याच्या एकाग्रतेचे कौतुक करत आहेत तर काहींनी हा व्हिडिओ पाहून आश्चर्य व्यक्त केले आहे. विद्युतची फिटनेस आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता याआधीही चर्चेत राहिली आहे. मात्र, ध्यानाच्या या व्हिडिओमुळे त्याच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक पैलू चाहत्यांसमोर आला आहे.

फिटनेससोबत मानसिक ताकदीवरही भर

विद्युत जामवाल हा केवळ अभिनेता म्हणूनच नाही तर मार्शल आर्ट्स आणि फिटनेसच्या क्षेत्रातील आपल्या कौशल्यामुळेही लोकप्रिय आहे. त्याच्या व्यायामाचे, अॅक्शन स्टंट्सचे आणि फिटनेस रुटीनचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. आता ध्यान करतानाचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्याने शारीरिक ताकदीसोबतच मानसिक एकाग्रतेलाही तो किती महत्त्व देतो याची चर्चा सुरू झाली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us