Video: भाई अंतरवर्स्त्र घालू शकत होतास; विना कपडे झाडावर चढताच अभिनेता झाला चांगलाच ट्रोल

सध्या सोशल मीडियावर एका बॉलिवूड अभिनेत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेता कपडे न घालता मोठ्या झाडावर चढताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

Video: भाई अंतरवर्स्त्र घालू शकत होतास; विना कपडे झाडावर चढताच अभिनेता झाला चांगलाच ट्रोल
Vidyut Jamvala
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jan 11, 2026 | 1:54 PM

बॉलिवूड कलाकारांचे खासगी आयुष्य कायमच चर्चेत असते. ते कोणाला डेट करत आहेत? त्यांची संपत्ती आणि इतर बऱ्याच गोष्टींची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना मिळत असते. कधीकधी कलाकारांना त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमुळे ट्रोलिंगचा देखील सामना करावा लागतो. नुकताच एका अभिनेत्याने विना वस्त्र झाडावर चढतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.

काय आहे व्हिडीओ?

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडीओ हा बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवालाचा आहे. तो नेहमीत काही तरी अतरंगी स्टंट करताना दिसतो. नुकताच त्याने नव्या वर्षाची सुरुवात अतिशय वेगळ्या पद्धतीने केल्याचे समोर आले आहे. विद्युतने विना वस्त्र झाडावर चढतानाचा व्हिडीओ त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की तो विनावस्त्र झाडावर चढला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत विद्युत जामवालाने दिलेल्या कॅप्शनने देखील लक्ष वेधले आहे. त्याने हा व्हिडीओ शेअर करत, कलरिपयट्टूचा सरावकर्ता म्हणून मी दरवर्षी एकदा सहज योगाचा अभ्यास करतो. सहज म्हणजे नैसर्गिक सहजतेत आणि सहज प्रवृत्तीच्या अवस्थेत परत जाणे, ज्यामुळे प्रकृतीशी आणि अंतर्मनातील जागृतीशी खोलवर जोडले जाणे शक्य होते. वैज्ञानिकदृष्ट्या हे अनेक न्यूरोरिसेप्टर्स आणि प्रोप्रियोसेप्टर्सना सक्रिय करते, ज्यामुळे संवेदनात्मक फीडबॅक सुधारतो, संतुलन आणि समन्वय वाढतो. यामुळे शरीराबद्दल अधिक जागरूकता येते, मानसिक एकाग्रता वाढते आणि प्रकृतीशी खोलवर जोडले जाण्याचा अनुभव मिळतो या आशयाचे कॅप्शन दिले आहे.

सध्या सोशल मीडियावर विद्युत जामवालाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. अनेकांनी यावर कमेंट्स करत त्याचे कौतुक केले आहे तर काहींनी विद्युतला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. एका युजरने कमेंट करत, ‘हा खरे आयुष्य जगत आहे’ असे म्हणत विद्युतचे कौतुक केले आहे. दुसऱ्या एका यूजरने “अरे सर, नेचरमध्ये इतकं डीप जाण्याची गरज नव्हती ना!” अशी कमेंट केली आहे. तिसऱ्या एका यूजरने, “टार्जन तरी पाने घालतो, पण सर तुम्ही तर महान आहात!” असे म्हटले आहे. एका यूजरने तर, भाई अंतरवर्स्त्र घालू शकत होतास अशी कमेंट केली आहे. सध्या सोशल मीडियावर विद्युत जामवालाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.